एका तबलिगीमुळे ४० डॉक्टर, नर्स क्वारंटाईन

06 Apr 2020 16:16:00
tablighi-e-jamat_1 &
 
 


लपवली निझामुद्दीन मकरज कार्यक्रमात सहभागी झाल्याची माहिती




पुणे
: दिल्लीतील निझामुद्दीन मकरज येथून परतलेल्या एका रुग्णामुळे ४० डॉक्टरांच्या डोक्यावर टांगती तलवार आहे. जमातच्या कार्यक्रमात गेल्याचे त्याने व कुटूंबियाने लपवल्याने ४० जणांना क्वारंटाईन करण्याची वेळ आली आहे. या तबलिगीवर एक शस्त्रक्रिया करण्यात आली होती. त्यावेळी त्याने आपण दिल्लीतील कार्यक्रमाहून आलो असल्याची माहिती लपवली. त्याची शस्त्रक्रिया आणि शुश्रूशा करणाऱ्या सर्वांचाच जीव त्याने धोक्यात घातला आहे.
 
 
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांनी तबलिगींसंदर्भात मोठे वक्तव्य केले होते. तबलिगींच्या बातम्या वारंवार दाखवल्या जाऊ नयेत. मात्र, असे प्रकार उघडकीस आल्यावर त्यांच्या या वक्तव्यावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. अशा लोकांबद्दल वाच्यता करायचीच नाही का, असाही सवाल विचारला जात आहे.
 
 
३१ मार्च रोजी एका रुग्णालयात अपघाताचा रुग्ण दाखल झाला. गंभीर इजा झाल्याने त्याच्या जखमांतून रक्तस्त्राव होत होता. डॉक्टरांनी त्याच्यावर उपचार केला. डॉक्टरांनी आपत्कालीन परिस्थितीत रुग्णाचा इलाजही केला. त्यावेळी त्याची माहिती विचारली. त्याने कुठून प्रवास केला आहे का असा सवालही विचारला. मात्र, त्याने दिल्लीतील जमातच्या कार्यक्रमाबद्दल काहीच माहिती दिली नाही. दोन दिवसांनी त्याला ताप येऊ लागला. यावेळी डॉक्टरांनी त्याच्या आईला पुन्हा याबद्दल विचारले असता तो दिल्लीतील कार्यक्रमात हजर होता, असे सांगितले.
 
 
 
हा प्रकार कळल्यानंतर लगेचच पिंपरी येथील रुग्णालयात रुग्णाशी दोन दिवसांत संपर्कात आलेल्या एकूण ४० डॉक्टरांना क्वारंटाईल करण्यात आले आहे. तसेच शल्यचिकित्सक, परिचिकांसह अन्य ३० आरोग्य कर्मचाऱ्यांना विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले असून सर्वांची कोरोना चाचणी करण्यात येणार आहे. तबलिगींनी देशभरात कोरोनाचा फैलाव वेगाने झाल्याची उदाहरणे आहेत. तसेच काही ठिकाणी तबलिगींकडून आरोग्य कर्मचाऱ्यांशी गैरवर्तन केल्याचेही प्रकार उघडकीस आले आहेत. या पार्श्वभूमीवर तणावात्मक परिस्थिती होती.




Powered By Sangraha 9.0