कौतुकास्पद ! पठाण बंधूंनी केली गरजू व्यक्तींसाठी केले एवढे दान

    दिनांक  06-Apr-2020 17:19:17
|

pathan brothers_1 &n
नवी दिल्ली : कोरोना विषाणूंसोबत लढण्यासाठी अनेक स्तरांमधून मदत होत आहे. स्तलांतरित तसेच गरजू व्यक्तींना मदत करण्यासाठी अनेकजण पुढे सरसावले आहेत. भारतीय संघाचे माजी क्रिकेटपटू इरफान आणि युसूफ पठाण यांनीदेखील समाजभान ठेवत गरजू व्यक्तींना मदत करण्यासाठी पुढे सरसावले आहेत. १० हजार किलो तांदूळ आणि ७०० किलो बटाटे पठाण बंधूंनी दान केले आहेत. यापूर्वीदेखील पठाण बंधूंनी आपल्या सामाजिक संस्थेद्वारे परिसरातील गरजू व्यक्तींना मोफत मास्कचे वाटप केले होते. इरफान आणि युसूफ हे भाऊ आपल्या वडिलांच्या नावाने सामाजिक संस्था चालवत आहेत.
 
 
 
'सध्याच्या काळात सरकारला ज्या पद्धतीच्या मदतीची गरज आहे ती मदत करायला आम्ही तयार आहोत. पुढचे काही दिवस खडतर असणार आहेत, त्यामुळे देशातील प्रत्येक नागरिकांना आम्ही घरातच थांबण्याची विनंती करतो. या काळात प्रत्येकाने आपल्या आरोग्याची काळजी घेणंही तितकच गरजेचे आहे,' असे पठाण बंधूंनी सांगितले आहे. दरम्यान, पठाण बंधूंव्यतिरीक्त बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली, बॅडमिंटनपटू पी.व्ही. सिंधू, अजिंक्य रहाणे, रोहित शर्मा, सचिन तेंडुलकर, बॉक्सर मेरी कोम, हिमा दास, बजरंग पुनिया यासारख्या खेळाडूंनी मदतकार्यात सहभाग घेतला आहे.
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.