अखेर गायिका कनिका कपूर कोरोनामुक्त!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    06-Apr-2020
Total Views |

kanika kapoor_1 &nbs

दोन निगेटिव्ह चाचणींनंतर दिला डिस्चार्ज; मात्र १४ दिवसांसाठी सक्तीचा होम क्वारंटाइन


लखनऊ : अखेर गायिका कनिका कपूरला कोविड १९ आजारातून बरे झाल्यामुळे रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. गेल्या महिन्यात तिला कोरोना विषाणूची लागण झाल्याचे स्पष्ट झाले होते. त्यानंतर तिच्यावर लखनऊमधील रुग्णालयात उपचार सुरू होते.


कनिकाच्या सहाव्या चाचणीचे निकाल सोमवारी आले. हे निकाल निगेटिव्ह असल्यामुळे तिला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्याचा निर्णय घेण्यात आला. तिच्यावर करण्यात आलेल्या पाचव्या चाचणीचा निकालही शनिवारी निगेटिव्ह आला होता. लागोपाठ दोन निकाल निगेटिव्ह आल्यानंतर कोरोनाबाधित रुग्ण बरे झाल्याचे ठरवून त्याला डिस्चार्ज दिला जातो. त्यामुळे सोमवारी कनिकाला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. सध्या तिला घरातच अलगीकरण (आयसोलेशन) पद्धतीने राहण्याचे सांगण्यात आले आहे.


दरम्यान, रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यावर कनिकापुढील अडचणी वाढणारच आहेत. कोरोना विषाणूची लागण झाल्याचे माहिती असल्यानंतरही सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी झाल्यामुळे तिच्याविरोधात तीन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. कनिकाला घरामध्ये विलगीकरण पद्धतीने राहण्याचे सांगण्यात आले होते. तरीही तिने सार्वजनिक कार्यक्रमात उपस्थिती लावल्यामुळे तिच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले.


कनिका कपूर ही बॉलिवूडमधील पहिली सेलिब्रिटी आहे जिला कोरोना विषाणूचा संसर्ग झाला होता. लंडनहून परतल्यानंतर तिला कोरोना संसर्गाची लक्षणे दिसायला लागली होती. पण आपली चाचणी होऊन त्याचा निकाल येईपर्यंत आपल्याला याबद्दल काहीच माहिती नव्हते, असे कनिकाने म्हटले आहे.
@@AUTHORINFO_V1@@