'सिक्सर किंग' युवराजची ५० लाखांची मदत

    दिनांक  06-Apr-2020 16:02:03
|

yuvraj singh_1  
मुंबई : भारतामध्ये कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव झाल्याचा आकडा हजारांवर जाण्याची चिन्हे दिसत आहेत. अशामध्ये केंद्र तसेच राज्य सरकारने अनेक उपाययोजना करत कोरोना विषाणूशी लढण्यामध्ये समर्थता दर्शवली आहे. अनेक स्तरांमधून आपल्या परीने मदतीचा ओघ सुरु केला आहे. यावेळी भारताचा 'सिक्सर किंग' युवराज सिंग यानेदेखील मदत निधीला ५० लाख दिले आहेत. भारताचा अष्टपैलू क्रिकेटपटू युवराज सिंग याने कोरोनाविरूद्ध लढ्यात एकत्र येण्याचे आवाहनदेखील केले.
 
 
कोरोना आणि लॉकडाउन यामुळे भारतात विविध प्रकारची संकटे उभी राहिली आहेत. सध्या देशात करोनाग्रस्तांची संख्या प्रचंड वाढत आहे. राज्यात देखील करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होताना दिसत आहे. अशा स्थितीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या लढाईचा सामना करण्यासाठी आर्थिक मदतीसाठी पीएम केयर निधीत आर्थिक मदत करण्याचे आवाहन केले आहे. त्यास उत्तम प्रतिसाद मिळत असून अनेक कलाकार, व्यापारी मंडळी, उद्योगपती, क्रीडापटू, संस्था आणि सर्वसाधारण जनता करोनावर मात करण्यासाठी पुढे सरसावले आहेत.
 
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.