जे दिवे बंद करतील त्यांच्या घरांवर निशाणी करा !

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    05-Apr-2020
Total Views |
Mamata Banerjee_1 &n




कोलकाता
: पश्चिम बंगाल सरकारवर वेळोवेळी हुकूमशाहीचे आरोप लागले आहेत, आताही अशाच प्रकारे बंगालमध्ये कोरोना महामारीच्या काळातही राजकारण थांबण्याचे नाव नाही. रविवार, दि. ५ एप्रिल रोजी रात्री नऊ वाजता ज्या ज्या घरातील वीज बंद ठेवली जाईल, त्या घरांवर निशाणी केली जाणार आहे, अशी फेसबूक पोस्ट तृणमुलच्या एका कार्यकर्ता प्रसून भौमिक याने लिहीली आहे. त्यामुळे तृणमुल काँग्रेसवर हा नवा आरोप केला जात आहे. 





 
प्रसून भौमिक आपल्या फेसबूक पोस्ट म्हणजे, "५ एप्रिल रात्री नऊ वाजता ज्या ज्या घरातील वीज बंद केली जाईल, त्या त्या घरांवर निशाणी केली जाईल." पश्चिम बंगालमध्ये यापूर्वी भाजप कार्यकर्त्यांची हत्या झाल्याचे प्रकार उघडकीस आले होते. अशातच या नव्या निशाणीच्या प्रकरणामुळे नवा वाद उफाळून आला आहे. 


भौमिक बंगाल थिएटरशी संलग्न एक कवि आहेत. त्यांनी कोलकाता विद्यापीठातून शिक्षण घेतले आहे. तृणमुल काँग्रेसमध्ये ते सक्रीय आहेत. पंतप्रधा नरेंद मोदी यांनी रविवार, दि. ५ एप्रिल रोजी रात्री नऊ वाजता घरातील दिवे बंद करून, नऊ मिनिटे मेणबत्त्या लावण्याचे आवाहन केले आहे. घरातील प्रत्येकाने एक दिवा पेटवण्याचे आवाहन मोदींनी केले आहे. प्रकाशाच्या या महाशक्तीद्वारे एका निर्धाराने देश या कोरोनाशी लढण्यासाठी एकजूट होईल, अशी भावना त्यांनी व्यक्त केली होती. मात्र, तृणमुल काँग्रेस या गोष्टीचे राजकारण करत असल्याचा आरोप होत आहे.







@@AUTHORINFO_V1@@