नव्या संधींच्या प्रकाशवाटा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    05-Apr-2020
Total Views |


agralekh_1  H x


सर्वसामान्यांचा मोदींना मिळालेला प्रतिसाद हा इतका अफाट होता की
, त्यादिवशी थाळी निनादाने आसमंत निनादून गेले होते. दिव्यांच्या प्रयोगालाही आज देशात असाच प्रतिसाद मिळाला. अंधाराकडून प्रकाशाकडे जाण्याचा सण साजरा करण्याची परंपरा असलेल्या या देशात या झारीतल्या शुक्राचार्यांपेक्षा नेतृत्वाचा प्रकाश दाखविणार्‍यांची विश्वासार्हता अधिक आहे.



कुठल्याशा लोककथांमध्ये एक गोष्ट सांगितली आहे. दोन हरीण वाघ मागे लागल्याने पळत असतात. पळता पळता दोघे एकत्र येतात. त्यातील एक हरीण दुसर्‍याला विचारते,“तुला वाघापेक्षा अजून जास्त गतीने धावता येईल का?” ते हरीण चटकन म्हणते, “मी तुझ्यापेक्षा जास्त गतीने धावलो तरी चालेल.आंतरराष्ट्रीय राजकारणाचेही काहीसे असेच आहे. कालपर्यंत विकसित राष्ट्रे म्हणून मिरविणार्‍या आणि त्याच अहंगंडातून सगळ्या जगाला पाहणार्‍या युरोपियन राष्ट्रांची स्थिती आज काय आहे? आजची महासत्ता म्हणून भारतावर निरनिराळे निर्बंध लादू पाहणार्‍या डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांची स्थिती काय आहे? येणार्‍या आठ-दहा दिवसात ‘लॉकडाऊन’ची स्थिती संपून जाईल. एका आव्हानाला सामोरे जायला हा देश तयार असेल. अमेरिका मात्र अजून टाळेबंदी करायची की करायची नाही, या तर्ककुतर्कात अडकला आहे. चीनची स्थिती याहून निराळी नाही. आज कोरोना आपल्या आटोक्यात आला असल्याचा आत्मविश्वास चीन दर्शवित असला तरी उर्वरित जग त्यावर विश्वास ठेवायला तयार नाही.



जागतिक व्यापार संघटनांच्या माध्यमातून निर्माण झालेल्या तरतुदी व अटींचा तिसर्‍या जगातील देशांना किती फायदा झाला आणि विकसित देशांना किती फायदा झाला? विकसित देशांच्या कक्षांमध्ये काम करणार्‍या मोठ्या कंपन्यांना या धोरणांचा किती फायदा झाला आणि विकसनशील देशांच्या लघु किंवा मध्यम आकाराच्या कंपन्यांना त्याचा किती फायदा झाला? ‘इंडियन’ नावाच्या अमेरिकन बनावटीच्या मोटारसायकलीवर बर्‍यापैकी कर आहे. तो कर कमी केला जावा, यासाठी ट्रम्प यांनी केलेला आटापिटा आपल्याला आठवतो का? यासाठी ट्रम्पना दोष देण्याचे कारण नाही. प्रत्येक राष्ट्र आपापले हित पाहात असते. अमेरिका, इस्त्रायलसारखे देश व्यापार-उदिमातून आपला राष्ट्रवाद जपत असतात. भारतासारख्या देशात आपली जडणघडण राष्ट्रभक्तीतून निर्माण झालेल्या राष्ट्रवादाची आहे. याच देशभक्तीला आता वेगळ्या प्रकारे धोरणात्मक पद्धतीने विचारात घ्यायची गरज निर्माण झाली आहे.आपल्याला क्षुल्लक वाटणार्‍या आणि भारतातल्या प्रत्येक औषधांच्या दुकानात उपलब्ध असलेल्या मलेरियाच्या गोळ्यांसाठी आज अमेरिका भारताची विनवणी करीत आहे.



ज्यांच्या विकसित वैद्यकीय तंत्रज्ञानाच्या रम्य-सुरस कथा जगभर सांगितल्या जातात
, अशा राष्ट्राला भारताची विनवणी करावी लागावी, हा नियतीचा काव्यगत न्यायच म्हणावा लागेल. याचा अर्थ केवळ मलेरियाच्या गोळ्या देऊन भारत महासत्ता होणार आहे, असे मुळीच नाही. पण कोरोनाच्या प्रभावामुळे, कोरोनाच्या संकटानंतर जग बदलणार आहे. सर्वच धर्मग्रंथात येणारे प्रलय सजीवांच्या प्रजाती बचावाची पद्धती सांगतात. एक जहाज, त्यात प्रत्येक प्रजातीच्या एका जोडप्याची कथा आहेच. इतके मोठे संकट कल्पिलेले असताना आज जगासमोर जे संकट उभे आहे, ते वास्तवापेक्षा त्याच्या भीतीनेच जास्त भरलेले आहे. मूळ मुद्दा आहे, आपण या परिस्थितीकडे कसे पाहतो हा. सुरुवातीला दिलेले हरणाचे उदाहरण कदाचित आजच्या घडीला आपल्याला स्वार्थाचे वाटेल पण भारत म्हणून आज आपण खरोखर असा विचार करायची गरज आहे.


आजच्या घडीला भारत अन्नधान्य, फळ-प्रक्रियायुक्त पदार्थांबरोरच औषधे आणि शस्त्रास्त्र निर्यातीतही आघाडी घेत असल्याचे आकडेवारीवरून दिसते. शस्त्रास्त्र बाजाराचाच विचार केला तर २०१५ पासून भारताने यात चांगलाच जोर पकडला. भारताची २०१६-१७ साली १ हजार, ५२१ कोटींची असलेली शस्त्रास्त्र निर्यात वाढून २०१७-१८ साली ४ हजार, ६८२ वर पोहोचली, तर २०१८-१९ साली ही निर्यात १० हजार, ७४५ कोटींवर पोहोचली आणि २०१६-१७ च्या तुलनेत ही वाढ होती तब्बल ७०० टक्क्यांची! स्टॉकहोम इंटरनॅशनल पीस रिसर्च इन्स्टिट्यूटच्या मार्च २०२० च्या अहवालातून ही माहिती समोर आली आहे. सध्या अमेरिका, ऑस्ट्रेलिया, फिनलॅँड, फ्रान्स, जर्मनी, इस्रायल, स्वीडन, जपान यांसह तिसर्‍या जगातील देशांनाही भारत शस्त्रास्त्र निर्यात करत आहे.



अजरबैजान
, सेशल्स, इंडोनेशिया, इस्टोनिया, गयाना, दक्षिण आफ्रिका, फिलिपिन्स, कतार, लेबनॉन, इराक अशा ४२ देशांचा यात समावेश होतो. ‘मेक इन इंडिया’ कार्यक्रमाचा हा परिणाम आहे. औषधी क्षेत्रातही भारतीय उत्पादनांचे नाव जगात घेतले जाते. भारताने २०१८-१९ या वर्षात १९.१३ अब्ज डॉलर्सची निर्यात केली. भारताने ही निर्यात अमेरिका, रशिया, युनायटेड किंग्डम, दक्षिण आफ्रिका आणि नायजेरियाला केली आहे. एकेकाळी अमेरिकेने काही अटींसह पाठवलेल्या मिलो गव्हावर गुजराण करणार्‍या भारताने कृषी क्षेत्रातील निर्यातीतही मोठी कामगिरी केली आहे. आर्थिक वर्ष २०१९मध्ये भारताने ३८.४९ अब्ज डालर्सची कृषी निर्यात केली आणि दिवसेंदिवस ही निर्यात वाढतच आहे. माहिती तंत्रज्ञान व बिपीओ क्षेत्रात आज भारताचा दबदबा आहे. २०१९ साली भारतीय आयटी-बिपीएम क्षेत्राची उलाढाल १७.७ अब्ज डॉलर्सची होती. ऑटोमोबाईल क्षेत्रातही भारतीय कंपन्यांनी चांगलीच झेप घेतली असून सुमारे १६० देशांत निर्यात केली जाते. त्यापैकी युरोपात ३६ टक्के तर आशिया आणि उत्तर अमेरिकन देशांत २५ टक्के निर्यात होते. भारत आपल्या शेजारील देशांना तर अनेक वर्षांपासून विविध वस्तूंची निर्यात करत आला. भूतानला तेल, इंधन, मशिनरी, खनिज, वाहनांची निर्यात केली तसेच विद्युतप्रकल्पांची उभारणीही केली. नेपाळलाही भारताने अशाप्रकारची निर्यात आणि मदत केलेली आहे. ज्या देशावर एकेकाळी जगातील विकसित देशांनी, महासत्ता अमेरिकेने निर्बंध लादले, तो भारत आज त्याच देशांना निर्यात करत आहे, ही अभिमानास्पद घटना. कोरोनाच्या संकटकाळात तर अमेरिका भारताकडे मलेरियावर वापरल्या जाणार्‍या औषधांची मागणी करत आहे!



मोदींनी दिवे लावण्याचा दिलेला संदेश आणि त्याच दिवशी अमेरिकेसारख्या बलाढ्य राष्ट्राला भारताकडे मदतीची याचना करण्याची वेळ यावी, हा कुणासाठी योगायोग असेलही पण यात काही शुभसंकेत ज्यांना मानायचा असेल त्यांनी मानावा; अन्यथा न मानणार्‍यांनाही या देशात स्थान आहेच. प्रत्येक आपातकाल काही ना काही वास्तव समोर घेऊन येत असतो. हा आपातकाल आपल्या देशातल्या ढोंगी पुरोगाम्यांचे बुरखे फाडणारा आहे. धर्मांध मुसलमानांच्या धर्मवेडेपणाने देशात हैदोस मांडलेला असताना हे लोक मोदींच्या दिवे लावण्याच्या संकल्पावर टीका करण्यात दंग आहेत. थाळ्या वाजविण्याच्या संकल्पावरही अशीच टीका झाली होती. काहींनी खवचटपणे यात भाग घेतला नव्हताच. मात्र, तरीही सर्वसामान्यांचा मोदींना मिळालेला प्रतिसाद हा इतका अफाट होता की, त्यादिवशी थाळी निनादाने आसमंत निनादून गेले होते.



दिव्यांच्या प्रयोगालाही आज देशात असाच प्रतिसाद मिळाला. अंधाराकडून प्रकाशाकडे जाण्याचा सण साजरा करण्याची परंपरा असलेल्या या देशात या झारीतल्या शुक्राचार्यांपेक्षा नेतृत्वाचा प्रकाश दाखविणार्‍यांची विश्वासार्हता अधिक आहे. देशाच्या नेतृत्वाची हीच विश्वासार्हता उद्योजकांना
, व्यावसायिकांना अपेक्षा ठेवण्यास प्रवृत्त करू शकते. कोरोनाच्या संकटानंतर आपल्या देशातील उद्योजक उभा राहणे आवश्यक आहे आणि तशी संधी अमेरिकेला मलेरियावरील औषध निर्यात केल्यास मिळण्याची शक्यता आहे. कारण, गेल्यावर्षीच चीनमध्ये कार्यरत असलेल्या अमेरिकेच्या २०० कंपन्यांनी भारताचा पर्याय स्वीकारायला उत्सुक असल्याचे म्हटले होते. अमेरिकन कंपन्या भारतात आल्यास त्यांना लागणार्‍या सुट्या भागांची, छोट्या वस्तू-उपकरणांची निर्मिती करणार्‍या अनेक भारतीय कंपन्या सुरू होतीलच. कोरोना विषाणू हे चीनचेच अपत्य असल्याचा आरोप याआधी डोनाल्ड ट्रम्प यांनी केला होता. या दोन्हीची सांगड घातली तर आगामी काळात अमेरिकन कंपन्यांचे भारतात पाऊल पडेल आणि देशातील उद्योग-व्यवसायही वाढीस लागेल, असे दिसते.

@@AUTHORINFO_V1@@