‘रामायणा’ने गाठला टीआरपीचा उच्चांक!

04 Apr 2020 15:38:55

ramayan_1  H x


पाच वर्षांतील मनोरंजन मालिकांच्या यादीत 'रामायण' प्रथमस्थानी विराजमान!

मुंबई : कोरोना विषाणूपासून देशाला वाचवण्यासाठी सरकारने देशभरात २५ मार्च ते १४ एप्रिलपर्यंत २१ दिवसांच्या लॉकडाउनची घोषणा केली. या काळात लोकांच्या आग्रहास्तव दूरदर्शनने ‘रामायण’ ही मालिका पुन्हा दाखवण्यास सुरुवात केली. दिवसाला दोन वेळा दूरदर्शन या चॅनेलवर ही मालिका दाखवली जाते.


रामानंद सागर यांच्या या जुन्या मालिकेने पुन्हा एकदा टीआरपीचे सर्व रेकॉर्ड तोडले आहेत. जेव्हा पहिल्यांदा टीव्हीवर रामायण ही मालिका दाखवली जात होती, तेव्हा देशात लॉकडाऊन सारखी स्थिती होऊन जायची. जेव्हा ही मालिका दूरदर्शनवर लागायची तेव्हा देशात कर्फ्यू लागल्या सारखे वाटायचे. त्यावेळेस ही मालिका अनेक भाषांमध्ये प्रसारित केली जात होती.


या लॉकडाऊनच्या काळात नागरिकांच्या आग्रहास्तव ही रामायण मालिका पुन्हा सुरु करण्याचा निर्णय सरकारने घेतला. ही मालिका सुरु झाल्यापासून पुन्हा एकदा या मालिकेने दाखवून दिले आहे ही आजही ही मालिका टीआरपीच्या बाबतीत सर्वोकृष्ट आहे. आजही या मालिकेच्या तोडीस दुसरी कुठलीही मालिका नाही. इतकेच नाही तर २०१५ पासून ते आतापर्यंतच्या मनोरंजक मालिकांमध्ये ही मालिका टॉपवर आहे.


सोशल मीडियावर रामायण आणि महाभारत या मालिका पुन्हा प्रसारित कराव्या अशी मागणी जोर धरु लागली होती. त्यानंतर या मालिका टीव्हीवर पुन्हा एकदा प्रसारित करण्यात आल्या. या मालिका बघून लोकांनी त्यांचे अनुभव सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
Powered By Sangraha 9.0