नमाजासाठी जमलेल्या जमावाकडून पोलिसांवर जीवघेणा हल्ला

    दिनांक  04-Apr-2020 15:15:29
|namaj _1  H x W


हल्य्याचा कट होता; घराच्या छपरांवर दगडविटांची जमवाजमव केली होती


उत्तरप्रदेश( कनौज): धर्मांध मानसिकतेच्या लोकांकरवी पोलिसांवर होत असलेले हल्ले थांबायचं नाव घेत नाहीत. कोरोना पार्श्वभूमीवर सेवा देणाऱ्या नर्सेस समोर विवस्त्र फिरणे, डॉक्टरांवर थुंकणे या प्रकारासोबतच आता पोलिसांवर हल्ले करण्याचे सत्रही विशिष्ट धर्मांध समुदायाकडून सुरु झाले आहे.


उत्तरप्रदेशमधील कनौज या ठिकाणी मुस्लीम धर्माचे लोक मोठ्या संख्येने जमले होते. पोलिसांनी संचारबंदीची अंमलबजावणी करण्याच्या अनुषंगाने कारवाई केली. मात्र कारवाई करण्यासाठी पोलीस घटनास्थळी दाखल झाले असता त्यांच्यावर दगड-विटांनी हल्ला करण्यात आला.UP police_1  H
 एका हिंदी वृत्तपत्रानी दिलेल्या माहितीनुसार हा हल्ला योजनाबद्ध असल्याचे समजते. कारण मोठ्या प्रमणात दगडविटा जमवून घराच्या छपरावर ठेवण्यात आल्या होत्या. तसेच काही पोलिसांचा गळा दाबण्याचा प्रयत्नही झाला. त्यामुळे हि प्रतिक्रिया नसून योजनाबद्ध कट होता हा संशय बळावत चालला आहे.आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.