सत्य स्वीकारण्याची भीती!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    04-Apr-2020
Total Views |

rajesh tope_1  



फाळणीची कटू फळे ही या वैचारिक मानसिकतेतून झाली. जेव्हा दंगली सुरू झाल्या, त्यावेळेस जात्यांध मुस्लीम समाजाच्या अत्याचाराला झाकून ठेवण्यात आले. खिलाफत चळवळीच्या काळातील अत्याचार झाकून ठेवले गेले. वंदे मातरम्ला विरोध झाल्यावर राष्ट्रगीत बदलले. ही जी मानसिकता आहे, त्या मानसिकतेतून सत्य झाकण्याचा केविलवाणा प्रयत्न जो केला जातो, तेच टोपे यांनी केले.


काल एका चर्चेच्या कार्यक्रमात आमच्या आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना महाराष्ट्रात कुठेही कोरोना योद्ध्यांवर कुठलेही हल्ले झालेले नाहीत आणि आम्ही सर्वांना विश्वासात घेऊन काम करत आहोत,” असे सांगितले तेव्हा डोळ्यासमोर मालेगाव येथे डॉक्टर लोकांवर झालेले हल्ले, नगरमध्ये एका विशिष्ट वस्तीत झालेले पोलिसांवरचे हल्ले, धारावी आणि मुंबईच्या काही भागात झालेले हल्ले झटकन समोर आले आणि मनात आले मग टोपे का असे बोलले? स्वतःची, समाजाची अशी फसवणूक का बरे ते करत आहेत? मग लक्षात आले ही टोपेंची चूक नाही. ही मानसिकता अनेक वर्षांपासून भारतात विकसित होत गेली. या मानसिकतेचे कारण राजकीय स्वार्थ आहे. या मानसिकतेचे दुसरे कारण स्वतःला पुरोगामीठरवण्यासाठी हे आवश्यक आहे, असे स्वातंत्र्यपूर्व काळात मानायला सुरुवात झाली, तीच प्रथा पुढे सुरू राहिली. याची येथील लोकांनी अत्यंत कटू फळे भोगली. या देशाने याची किंमत मोजली. फाळणीची कटू फळे ही या वैचारिक मानसिकतेतून झाली. जेव्हा दंगली सुरू झाल्या, त्यावेळेस जात्यांध मुस्लीम समाजाच्या अत्याचाराला झाकून ठेवण्यात आले. खिलाफत चळवळीच्या काळातील अत्याचार झाकून ठेवले गेले. वंदे मातरम्ला विरोध झाल्यावर राष्ट्रगीत बदलले. ही जी मानसिकता आहे, त्या मानसिकतेतून सत्य झाकण्याचा केविलवाणा प्रयत्न जो केला जातो, तेच टोपे यांनी केले.


वास्तविक कोरोनाच्या या युद्धात जागतिक स्तरावर अगदी डब्ल्यूएचओने पण भारतीय नेतृत्व आणि भारतीय समाजाचे कौतुक केले. ही लढाई आम्ही जिंकणार, अशी परिस्थिती निर्माण झाली, त्याच वेळेस तबलिगीच्या दिल्ली येथील निजामुद्दीन कांडने सगळा देश खडबडून जागा झाला. संपूर्ण जगातून बाधित झालेले मौलवी भारताच्या वेगवेगळ्या जागी खेडोपाडी पसरले आणि त्यांनी सगळीकडे बाधित करण्यास सुरुवात झाली. त्यांना शोधणे हे देशभरातील सरकारी यंत्रणेने युद्धपातळीवर सुरू केल्यावर सर्व ठिकाणी पोलीस यंत्रणा आणि डॉक्टर्स, परिचारिका यांच्यावर दगड फेकायला आणि थुंकायला सुरुवात केली. हे सगळे उघड पाहत आहेत. मशिदीत धर्मगुरू उघडपणे मशिदीत आवाहन करत आहेत, एकत्र नमाज करायला सांगत आहेत. लॉकडाऊनकसे अयशस्वी होईल, असे बघितले जात आहे.



तरीसुद्धा राजेश टोपे खोटे बोलले. सर्व डावे विचारवंत, अंधश्रद्धा निर्मूलन संघटनेचे कार्यकर्ते हे गप्प आहेत. बॉलीवूड पुरोगामी संप्रदाय गप्प आहे. हे सत्य स्वीकारण्यास घाबरणारी राजकारणी मंडळी आणि वृत्तपत्रातून, मीडियातून उपदेश करणारी मंडळी जो विचार मुस्लीम समाजात विष पेरत आहे, त्या वृत्तीला शक्ती देत आहे. जागतिक पातळीवर चीनची कम्युनिस्ट वृत्ती सगळ्या जगावर राज्य करण्याची त्यांची महत्त्वाकांक्षी, राक्षसी प्रवृत्ती! अमेरिकेची भांडवली वृत्ती जगावर अधिराज्य करण्याची आणि ही धर्मांध जातीय वृत्ती यांच्यामुळे समस्त जगावर अस्तित्वाच्या लढाईची वेळ आली आहे. अशा वेळेस भारतीय जीवनपद्धतीच जगाला वाचवू शकते, हे स्पष्टपणे सांगणे गरजेचे आहे.




पण, त्यापेक्षा सेमिटिकआणि धर्मांध विचारांची विषवल्ली मुळापासून उपटून काढण्यापेक्षा ती झाकून ठेवण्याची जी शहामृगी प्रवृत्ती देशाच्या मुळावर आली आहे, त्यामुळेच टोपे तेच बोलणार जे त्यांच्या धन्याला आवडणार आणि त्यांच्या धन्याला समस्त धर्मांध मुसलमानांची काळजी पडली आहे. टोपे जालन्याचे आहेत आणि संभाजीनगर, जालना भागात वाढणारे मदरसे आणि तबलिगीज्या आहेत, तेथे काय चालले आहे ते बघावे, अशी त्यांना विनंती आहे. येणार्‍या काळात सत्य स्वीकारून जर आम्ही पुढील योजना बनवली नाही, तर येणार्‍या काळात पुढील पिढ्यांचे जे नुकसान होईल, त्यात कुणाचीच वाचण्याची शक्यता नाही. टोपेजी, शेजारीच जिजामातेचे गाव आहे. त्या जगन्मातेने सत्य स्वीकारले म्हणून छत्रपतीजन्माला आले. सत्यापासून लांब गेले तर नामुष्की अटळ आहे. या राजकीय आणि विचारवंतांच्या पाठबळावर काही मूठभर मंडळींची ताकद वाढत आहे आणि ज्या मुस्लीम बंधूंना या लोकांना विरोध करायचा आहे, त्यांच्या शक्तीचे खच्चीकरण होत आहे. भारताच्या भविष्यासाठी आणि कोरोनाच्या लढाईसाठी सत्य स्वीकारण्याची तयारी ठेवा. सत्य मांडा आणि सत्यच बोला!

रविंद्र मुळे

@@AUTHORINFO_V1@@