परदेशी तब्लिगीच्या संपर्कात आलेल्या २५ व्यक्ती ताब्यात

04 Apr 2020 17:50:38

tabligi _1  H x
अहमदनगर : कोल्हार येथील मस्जिदमध्ये दोन दिवस वास्तव्य करून गेलेली इंडोनेशिया येथील व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह असल्याची माहिती आरोग्य अधिकारी डॉक्टर संजय घोलप यांनी दिली. त्यामुळे त्याच्या संपर्कात आलेल्या येथील २५ व्यक्तींना तपासणीकरिता ताब्यात घेण्यात आले आहे. या एकूणच प्रकारामुळे कोल्हार भगवतीपुरमध्ये खळबळ माजली असून या पार्श्वभूमीवर दोन दिवस कोल्हार सह सात गावांमध्ये दवाखाना व मेडिकल वगळता सर्व अत्यावश्यक सेवाही बंद करण्यात आल्या आहेत
दिल्ली येथील मरकजमधील तब्लिगी जमातीच्या धार्मिक कार्यक्रमात सहभागी इंडोनेशिया येथील व्यक्तीला ताब्यात घेण्यात आले होते. ही व्यक्ती तत्पूर्वी कोल्हार येथे देखील राहून गेल्याने त्याच्या संपर्कात आलेल्या कोल्हार येथील ७, पाथरे येथील ४ हसनापूर येथील ६, दाढ येथील ५, लोणीमधील ३ अशा एकूण २५ जणांना संशयित म्हणून ताब्यात घेतले आहे. जिल्हा नियंत्रण कक्षातून मिळालेल्या माहितीनुसार खबरदारीचा उपाय म्हणून वरील २५ जणांची तपासणी करण्यात येणार आहे. कोल्हार मध्ये सुमारे मरकजमध्ये सहभागी ९ परदेशी नागरिक येऊन गेल्याची चर्चा गावात आहे मात्र त्यास अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.
Powered By Sangraha 9.0