“काल इरफान, आज ऋषी कपूर... सत्य पचवणे कठीण”

    दिनांक  30-Apr-2020 16:14:33
|

irrfan khan rishi kapur_1
मुंबई : ३० एप्रिलची सकाळ ही भारतीयांसाठी आणखी एक धक्का देणारी होती. २९ एप्रिलला हिंदी चित्रपट सृष्टीतील दिग्गज अभिनेता इरफान खान यांच्या जाण्याच दुःख रुचते न रुचते तोपर्यंत सकाळी ऋषी कपूर यांच्या निधनाची बातमी पडली आणि सर्व भारतीय हादरून गेले. “काल इरफान खान, आज ऋषी कपूरजी... सत्य पचवणे खूप अवघड जात आहे,” अशा शब्दांमध्ये भारताचा कर्णधार विराट कोहलीने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
 
 
 
 
 
अभिनेता इरफान खान यांच्या बातमीला २४ तासही झाले नव्हते तेव्हा ऋषी कपूर यांची बातमी महानायक अमिताभ बच्चन यांनी दिली. वयाच्या ६८व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. मुंबईतल्या एच. एन. रूग्णालयात २९ तारखेला त्यांना प्रकती अस्वास्थ्यामुळे दाखल करण्यात आले होते. मात्र त्यांचे ३० एप्रिलला उपचारादरम्यान निधन झाले. संपूर्ण देशभरातू त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
 
 
 
 
 
 
सचिन तेंडूलकरनेही ट्विटवरून त्यांना श्रद्धांजली वाहिली असून, “ऋषी कपूर यांच्या निधनाची बातमी समजली. हे वृत्त समजल्यावर मला खूपच दु:ख झाले. ऋषी कपूर यांचे सिनेमे पाहतच मी लहानाचा मोठा झालो. मी त्यांना अनेकदा भेटलो होतो. प्रत्येक वेळी ते हसून माझे स्वागत करायचे आणि कायम खुश दिसायचे. देव त्यांच्या आत्म्याला शांती देवो, हीच प्रार्थना. मी त्यांच्या कुटुंबीयांच्या दु:खात सहभागी आहे.” अशा भावना त्याने व्व्याक्त केल्या आहेत. दरम्यान, माजी दिग्गज फिरकीपटू अनिल कुंबळे, माजी फलंदाज मोहम्मद कैफ आदी क्रिकेटपटूंनी ऋषी कपूर यांना ट्विटच्या माध्यमातून श्रद्धांजली वाहिली आहे.
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.