ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर काळाच्या पडद्याआड!

    दिनांक  30-Apr-2020 09:51:40
|

Rishi kapoor_1  श्वसनाचा त्रास झाल्यामुळे ऋषी कपूर यांची प्राणज्योत मालवली


मुंबई : बॉलिवूड अभिनेते ऋषी कपूर यांचे आज वयाच्या ६७ व्या वर्षी मुंबईमध्ये निधन झाले आहे. मागील काही दिवस कॅन्सरशी झुंज देणार्‍या ऋषी कपूर यांची प्राणज्योत गुरुवारी मालवली. दरम्यान गुरुवारी रात्री त्यांना मुंबईच्या रिलायंस हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. श्वसनाच्या त्रासामुळे त्यांनी मुंबईच्या रिलायंस हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र त्यांची ही झुंज अपयशी ठरली. बॉलिवूडचे शहेनशाह बिग बी अमिताभ बच्चन यांनी ट्वीट करत ही माहिती दिली आहे.

अमिताभ बच्चन यांनी ऋषी कपूर गेले. ‘तो गेला... आणि मी बिथरलोय...’, असे हतबल ट्वीट करत ही दु;खद बातमी शेअर केली आहे. दरम्यान मागील वर्षभरापासून अधिक काळ अमेरिकेमध्ये त्यांच्यावर कर्करोगासाठी उपचार होते. दरम्यान सध्या हॉस्पिटलमध्ये ऋषी कपूर यांच्यासोबत त्यांची पत्नी नीतू कपूर होत्या. कॅन्सर सारख्या दुर्धर आजाराने लागोपाठ दुसर्‍या दिवशी बॉलिवूडच्या दुसर्‍या अभिनेत्याला आपल्या जाळ्यात ओढलं आहे.

ऋषी कपूर यांना सप्टेंबर २०१८ मध्ये हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर उपचार झाल्यानंतर वर्षभरानंतर ते भारतात परतले. दरम्यान या काळातही त्यांना दोनदा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दिल्लीत इंफेक्शन झाल्याने, तर मुंबईमध्ये व्हायरल फिव्हरमुळे त्यांना काही काळ हॉस्पिटलमध्ये ठेवण्यात आले होते. काल इरफान खान आणि आज ऋषी कपूर... चित्रपट सृष्टीतले दोन हिरे गेल्याने अवघ्या चित्रपटसृष्टीवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.