बुट्टा बोम्मावर थिरकतोय क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नर !

30 Apr 2020 16:30:41

buttabomma_1  H



मेलबोर्न
: अल्लू अर्जुनचा अभिनय असणारी अला वैकुंटापूरमलू हा त्रिविक्रम श्रीनिवास दिग्दर्शित चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच चर्चेत आला आहे. या चित्रपटाच्या रिलीजच्या अगोदरच एस.एस. थामन यांनी संगीतबद्ध केलेली गाणी जोरदार हिट ठरली आहे. ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरने हा अला वैकुंटापूरमलूच्या 'बट्टा बोम्मा' या गाण्यावर थिरकताना दिसला.




डेव्हिड वॉर्नरने काही आठवड्यांपूर्वीच आपल्या मुलीच्या इच्छेपोटी टिकटॉकवर पदार्पण केले. यांनतर मात्र लॉकडाउनच्या काळात कुटुंबातील सदस्यांसह टिकटोक व्हिडिओ करुन तो या क्वारंटाईन काळाचा पुरेपूर वापर करून इतरांनाही आनंद देण्यासाठी प्रयत्नशील आहे. डेव्हिड वॉर्नरने इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला असून त्यामध्ये तो पत्नी कॅन्डिस वॉर्नरसह #बुट्टा_बोम्मा गाण्यावर थिरकताना दिसत आहे. त्यांनी लिहिले की, "ही वेळ आहे टिकटॉक करण्याची #बुट्टबोम्मा वर थिरकण्याची आपल्या कम्फर्ट झोनमधून बाहेर पडा. आनंदी राहा."सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या गाण्यात डेव्हिड आणि कँडिसची मुलगी या गाण्यात दिसत आहे. आणि सीमापार या गाण्याची लोकप्रियता पाहता अभिनेता अल्लू अर्जुन भारावून गेला. त्याने डेव्हिड वॉर्नरचे आभार मानले.


Powered By Sangraha 9.0