नर्ससमोर विवस्त्र फिरणाऱ्यांवर राष्ट्रीय सुरक्षा कायद्याअंतर्गत कारवाई

03 Apr 2020 15:56:09
UP Goverment_1  




लखनऊ : गाझियाबादच्या रुग्णालयात नर्ससमोर विवस्त्र होऊन विडी, सिगारेट मागणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाणार आहे. तबलिगी-ए-जमातच्या सहा मुस्लीमांवर ही कारवाई केली जाणार आहे. त्यांना एमएमजी रुग्णालयाच्या विलगीकरण कक्षातून आता राजकुमार गोयल इंस्टीट्यूट ऑफ टेक्नोलॉजी येथे हलवण्यात आले आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी कठोर कारवाई आहे. त्यांना यापुढे तुरुंगातच क्वारंटाईन केले जाण्याची शक्यता आहे.


राष्ट्रीय सुरक्षा कायद्याअंतर्गत ही कारवाई केली जाणार आहे. ज्या ज्या ठिकाणी तबलिगी-ए-जमातचे संशयित कोरोनाग्रस्त आहेत, तिथे एकही महिला आरोग्य कर्मचारी किंवा पोलीस नियुक्त केली जाणार नसल्याचे सरकारने सांगितले आहे. तबलिघी-ए-जमाती मुस्लीम ज्या ज्या ठिकाणी अशाप्रकारे गैरवर्तन करताना आढळून येतील, त्यांची रवानगी आता थेट जेलमध्येच करावी आणि तिथेच त्यांच्यावर उपचार करावे, असे स्पष्ट निर्देश मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दिले आहेत.



मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले, "हे लोक ना कायदा मानतात ना व्यवस्था मानतात. हे मानवतेचे शत्रू आहेत. ज्या ज्या लोकांनी महिला कर्मचाऱ्यांशी गैरवर्तन केले आहे, त्यांच्यावर कडक कारवाई केली जाणार आहे. इंदुरसारख्या घटनेची पुनरावृत्ती उत्तर प्रदेशमध्ये होणार नाही. अशा मनोवृत्तीचे लोक जिथे जिथे आहेत. त्यांच्यावर कडक कारवाई केली जावी."
Powered By Sangraha 9.0