आओ फिर से दिया जलाएँ... !

03 Apr 2020 12:20:28


narendra modi_1 &nbs


कोरोनाचा मुकाबला करताना मनोधैर्य मजबुत हवे
: पंतप्रधान मोदी


नवी दिल्ली : कोरोना महासाथीचा सामना करण्यासाठी देशात २१ दिवसांचा लॉकडाऊन सुरू आहे. भारतातच नव्हे, तर संपूर्ण जगभरात एक प्रकारचे नैराश्य साचलेले असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी रात्री नऊ वाजता देशवासियांना दिवा पेटवून मनोधैर्य वाढविण्याचे आव्हान केले आहे. त्यामुळे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या आओ फिर से दिया जलाएँ, भरी दुपहरी में अँधियारा, सूरज परछाई से हारा, अंतरतम का नेह निचोड़ें-बुझी हुई बाती सुलगाएँ, आओ फिर से दिया जलाएँ या काव्यपंक्ती अगदी सार्थ ठरणार आहेत.



जगभरात थैमान घालणाऱ्या कोरोनामुळे संपूर्ण जग ठप्प झाले आहे. भारतातदेखील कोरोना महासाथीचा सामना करण्यासाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकारे युद्धपातळीवर काम करीत आहेत. मात्र
, तरीदेखील मनात भिती आणि नैराश्य निर्माण होणे साहजिक आहे. बरेचदा रोगापेक्षाही त्याची भितीच जास्त भयानक ठरत असते. त्यासाठी मनोधैर्य वाढविणे अत्यंत गरजेचे असते.  त्याचाच एक भाग म्हणून पंतप्रधान मोदी यांनी शुक्रवारी सकाळी नऊ वाजता देशवासियांच्या नावे एक संदेश प्रसारित केला. त्यात ते म्हणाले की, रविवारी म्हणजे ५ एप्रिल रोजी रात्री नऊ वाजता कोरोना संकटाला प्रकाशाची ताकद दाखवून द्यायची आहे. त्यासाठी १३० कोटी देशवासियांनी नऊ वाजता नऊ मिनीटे घराबाहेर न पडता, रस्त्यावर न येता घरातील सर्व विजदिवे बंद करून घराचा दरवाजा, खिडकी अथवा गॅलरी येथे दिवा, मेणबत्ती, टॉर्च अथवा मोबाईल फोनचा फ्लॅशलाईट लावायचा आहे, असे आवाहन त्यांनी केले आहे.



यामुळे काय साध्य होईल
, हे सांगताना मोदी म्हणाले की, जेव्हा चहुबाजूंनी एक एक दिवा पेटेल तेव्हा देशभरात प्रकाशाच्या महाशक्तीचा प्रभाव वाढेल. त्याद्वारे आम्ही एकजुट आहोत आणि संकटाला परतावून लावण्यासाठी सज्ज आहोत, असा संकल्प मजबुत होण्यास मदत होणार आहे. त्याचप्रमाणे वेळोवेळी आणि प्रामुख्याने संकटसमयी देशवासियांच्या विराट सामुहिक शक्तीचे दिव्यत्व समोर येणे गरजेचे असते. देश मोठी लढाई लढत असताना जनताजनार्दनाची विराट शक्ती पाठिशी असणे अत्यंत गरजेचे असल्याचेही मोदी यावेळी म्हणाले. त्याचवेळी लढाई अद्याप संपलेली नाही, ही जाणीवदेखील त्यांनी देशवासियांना करून दिली आहे. त्यामुळे हम पड़ाव को समझे मंज़िल, लक्ष्य हुआ आँखों से ओझल, वर्त्तमान के मोहजाल में-आने वाला कल न भुलाएँअशी स्पष्ट जाणीवही पंतप्रधान मोदी यांनी देशवासियांना करून दिली आहे.




एकीकडे संपूर्ण देश महासाथीचा सामना करती आहे
, तर दुसरीकडे तबलीगी मुस्लीम अराजकता पसरविण्यात मग्न आहेत. दिल्ली आणि उत्तर प्रदेशात तबलीगी मंडळी डॉक्टर आणि परिचारिकांवर थुंकत असल्याच्या संतापजनक घटनाही समोर आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर जनतेचे मनोधैर्य वाढविणे अत्यंत गरचेचे आहे. त्यामुळे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या या ओळी अधिकच प्रासंगिक ठरताय- आहुति बाकी यज्ञ अधूरा, अपनों के विघ्नों ने घेरा, अंतिम जय का वज़्र बनाने-, नव दधीचि हड्डियाँ गलाएँ, आओ फिर से दिया जलाएँ

Powered By Sangraha 9.0