पाच दिवसांच्या बाळाची मुंबईत कोरोनावर मात

03 Apr 2020 12:28:03

new born baby_1 &nbs


मुंबई
: कस्तुरबा रुग्णालयात कोरोनाचा उपचार घेत असणाऱ्या नवजात बालक व त्याच्या आईची कोरोनाची दुसरी चाचणी निगेटिव्ह आली आहे. चेंबूर येथील एका पाच दिवसाच्या बाळाने कोरोनावर यशस्वी मात केली आहे. ६ मार्च रोजी चेंबूरच्या साई रुग्णालयात या महिलेला आणि तिच्या पाच दिवसाच्या बाळाला करोनाची लागण झाल्याचे लक्षात आले होते. तर या मुलाच्या वडिलांची चाचणी निगेटिव्ह आली होती. त्यामुळे या दोघांनाही तातडीने कस्तुरबा रुग्णालयात हलविण्यात आले. या दोघांवर कस्तुरबामध्ये उपचार सुरू असतानाच खबरदारीचा उपाय म्हणून मुलाच्या वडिलांनाही कस्तुरबामध्ये क्वॉरंटाइन करण्यात आले. काल या तिघांचेही रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. आज पुन्हा या तिघांची टेस्ट केली जाणार आहे. त्यांचा हा रिपोर्टही निगेटिव्ह आल्यास या तिघांना रुग्णालयातून डिस्चार्ज दिला जाईल,अशी माहिती मिळते. दरम्यान, राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या ४१६ वर गेली आहे. कालच्या एका दिवसात राज्यात ५७ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर, आतापर्यंत १९ मृत्यू झाले आहेत. 
Powered By Sangraha 9.0