देशात आज नोंदवले गेले सर्वात जास्त कोरोना बाधित रुग्ण

03 Apr 2020 20:43:01
india_1  H x W:

चोवीस तासांमध्ये ४७८ रुग्णांची नोंद

 
 
मुंबई (प्रतिनिधी ) - गेल्या चोवीस तासांमध्ये भारतामध्ये ४७८ कोरोना पाॅझिटिव्ह रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. महत्त्वाचे म्हणजे आजतागायत चोवीस तासांमध्ये आढळणाऱ्या कोरोना बाधितांची ही सर्वात मोठी संख्या आहेे. देशात कोरोनाग्रस्त रुग्णांचा आकडा २,५४७ वर पोहोचला आहे.
 
 
देशात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढत असल्याचे पुन्हा एकदा आकडेवारीहून समोर आले आहे. देशात आजवर कोरोनाची लागण झालेल्यांचा आकडा २ हजार ५४७ असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे. यामधील २ हजार ३२२ कोरोना बाधित रुग्ण सध्या उपचार घेत आहेत. तर आजवर १६२ लोकांना घरी सोडण्यात आले असून ६२ जणांचा मृत्यू झाला आहे. आज संपूर्ण देशभरात ४७८ कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत. यापूर्वी चोवीस तासांमध्ये कधीच एवढ्या संख्येने कोरोनाचे रुग्ण देशात आढळले नव्हते. त्यामुळे कोरोनाग्रस्तांची वाढती संख्या चिंतेची बाब आहे.
Powered By Sangraha 9.0