नेपाळमधील १४ तब्लीगींना मशिदीत लपवले ; नगरमध्ये गुन्हा दाखल

03 Apr 2020 14:43:18


FIR_1  H x W: 0


नेपाळमधील १४ तब्लीगींना मशिदीत लपवले ;
नगरमध्ये पाच जणांविरोधात गुन्हा दाखल


अहमदनगर : संगमनेरमध्ये नेपाळमधील तब्लीग जमातीच्या १४ जणांना मशिदीत आणि नंतर घरी वास्तव्यास ठेवण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. याप्रकरणी मोमीनपुरा येथील पाच जणांविरोधात शहर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे.



FIR_1  H x W: 0


हाजी जलीमखान कासामखान पठाण, हाजी शेख जियाऊद्दीन आमीन, जैनुद्दीन हुसेन परावे, हाजी इमाम जैनुद्दिन मोमीन, रिजवान गुलामनवी शेख (सर्व रा. मोमीनपुरा, संगमनेर) अशी गुन्हा दाखल झालेल्या पाच जणांनी नावे आहेत. त्यांच्याविरोधात शहर पोलीस ठाण्यात गुरुवारी (२एप्रिल) रात्री उशिरा पोलीस नाईक सलीम रमजान शेख यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल झालेल्या पाच जणांनी नेपाळमधील तबलीग जमातीच्या १४ जणांना शहरातील एका मशिदीत व नंतर रहेमतनगर येथे स्वतःच्या घरी वास्तव्यास ठेवले. या १४ जणांना पोलिसांनी ताब्यात रात्री उशिरा ताब्यात घेत त्यांची वैद्यकीय तपासणी केली असून त्यांना होम क्वारंटाईन करण्यात आल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी रोशन पंडित यांनी दिली. या प्रकरणाचा तपास पोलीस कॉन्स्टेबल रमेश लबडे करत आहेत. राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा ४१६ असून नगरमध्ये सध्या १७ कोरोना रुग्ण उपचार घेत आहेत.


दोन परदेशी नागरिकांसह सहा जण कोरोना बाधित, 
जिल्ह्यात एकूण कोरोनाबाधितांची संख्या आता चौदावर



जिल्हा आरोग्य यंत्रणेने पुण्याच्या राष्ट्रीय विषाणू संस्थेकडे बुधवारी सकाळपर्यंत ११२ व्यक्तींचे स्त्राव तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यातील ५१ स्त्राव चाचणी अहवाल गुरुवारी प्राप्त झाले. त्यात सहाजण बाधित असल्याचे स्पष्ट झाले आहे. यातील दोन परदेशी व्यक्तीपैकी एक इंडोनेशिया येथील तर दुसरा जिबुटी येथील आहे. या व्यक्तींनी नवी दिल्ली येथील निजामुद्दीन येथे झालेल्या कार्यक्रमात सहभाग घेतला होता. त्यानंतर ते संगमनेर आणि मुकुंदनगर येथील व्यक्तींच्या संपर्कात आले होते. त्यांनाही कोरोनाची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने स्थानिक पातळीवरील सर्व यंत्रणा कार्यान्वित केल्या असून संगमनेर आणि मुकुंदनगर परिसरात प्रतिबंधात्मक आदेशांची कठोर अंमलबजावणी करण्याचे आदेश जिल्हाधिकारी श्री. द्विवेदी यांनी दिले आहेत.

Powered By Sangraha 9.0