रविवारी रात्री नऊ वाजता प्रत्येकांनी नऊ मिनिटे दिव्यांनी उजळवूया!

03 Apr 2020 09:52:33
modi_1  H x W:


कोरोनाच्या अंध:काराला दूर करण्यासाठी एकजूट दाखवूया; पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून जनतेला आवाहन

मुंबई : कोरोना विषाणूच्या महामारीमुळे जगात अंधकार पसरला आहे, हा अंधार आपल्याला निरंतर प्रकाशाने दूर करायचा आहे. यासाठी रविवारी ५ एप्रिलला प्रत्येक भारतवासीयांनी ९ मिनिटांचा वेळ द्यायचा आहे. यासाठी रात्री नऊ वाजता सर्वांनी आपल्या घराचे दिवे बंद करायचे आहेत. या नऊ मिनिटांत प्रत्येकांनी दरवाज्यात किंवा बालकनीत उभे राहून मेणबत्ती, दिवा लावून किंवा टॉर्च, मोबाइलची फ्लॅशलाइट सुरु करून अंधकार दूर करायचा आहे, असे आवाहन मोदींनी केले आहे.


या दिवशी प्रत्येकाने प्रत्येकाला तिमिरातून तेजाकडे नेण्याचा प्रयत्न करायचा आहे. कोरोनाच्या संकटामुळे देशातील गरीब भावंडांमध्ये नैराश्येचे वातावरण आहे, म्हणूनच त्यांना निराशेतून आशेकडे न्यायचे आहे. दारात एक दिवा लावताना आपण या लढाईत एकटे नाही असे एकमेकांना सांगून निराशेचा अंध:कार दूर करण्याचा संकल्प करायचा आहे, असेही मोदींनी सांगितले. मात्र हे करत असताना कोणीही एकत्र यायचे नाही किंवा रस्त्यावर जमायचे नाही, सोशल डिस्टन्सचे भान ठेवून प्रत्येकाने अनुकरण करायचे आहे असाही संदेश त्यांनी देशवासीयांना दिला आहे.



Powered By Sangraha 9.0