मित्र राष्ट्रांच्या मदतीसाठी भारतीय नौदल तयार;सहा जहाजे तैनात

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    03-Apr-2020
Total Views |
ship_1  H x W:
 
 
 

पाच वैद्यकीय पथकांची विशेष नियुक्ती

 
मुंबई (प्रतिनिधी) - कोरोना व्हायरस संक्रमणाच्या वाढत्या संकटात मित्र राष्ट्राला मदत करण्यासाठी भारतीय नौदलाची सहा जहाजे तयार करण्यात आली आहेत. परिस्थिती आणखी बिकट झाल्यास जहाजांसोबतच मालदीव, श्रीलंका, बांग्लादेश, नेपाळ, भूतान आणि अफगाणिस्तान या देशांसाठी पाच वैद्यकीय पथकांचे नियोजन करण्यात आले आहे.
 
 
 
भारतात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढत असतानाच देशाचा संरक्षण विभाग आपल्या मित्र देशांच्या मदतीसाठी देखील सज्ज झाला आहे. मित्र राष्ट्रांची मदत करण्यासाठी भारतीय नौदलाने सहा जहाजे तैनात केल्याची माहिती मिळाली आहे. याशिवाय वैद्यकीय पथकेही तयार करण्यात आली आहेत. मालदीव, श्रीलंका, बांग्लादेश, नेपाळ, भूतान आणि अफगाणिस्तान या मित्र राष्ट्रांना कोरोनाशी लढण्यासाठी मदत लागल्यास ही जहाजे आणि वैद्यकीय पथकांना पाठविण्यात येणार आहे. ३० मार्च रोजी भारतीय सैन्याने नेपाळला वैद्यकीय साधनसामुग्री पाठवली होती. 'डॉर्नियर' हे मालवाहू विमान आणि 'एमआय-१७' या हेलिकाॅप्टरमधून वैद्यकीय साधनसामुग्री सोमवारी गोरखपूर येथे उतरविण्यात आली. त्यानंतर रस्ते मार्गाने ती नेपाळपर्यंत पोहचवली गेली.
 
 
 
सार्क राष्ट्रांच्या कोरोना व्हायरस सहाय्यता निधीमध्ये भारताने १० कोटी डाॅलर्सचे योगदान दिले आहे. सार्क राष्ट्रांमधील पाकिस्तान वगळता सर्व राष्ट्रांनी या निधीमध्ये आपले योगदान दिले आहे. श्रीलंकेने ५ दशलक्ष डाॅलर्स, बांग्लादेशने १.५ मिलियन डाॅलर्स, नेपाळ आणि अफगाणिस्तानने १ दशलक्ष डाॅलर्स आणि मालदीवने २ लाख डाॅलर्स आणि भूतानने १ लाख डाॅलर्सचे योगदाने दिले आहे. भारतीय जहाजांनी चीनमधील वुहानमध्ये अडकलेल्या दक्षिण आशियाई देशांमधील काही नागरिकांना बाहेर काढले आहे. यामध्ये २३ बांग्लादेशी आणि ९ मालदीवच्या नागरिकांचा समावेश आहे. तर जपानच्या सागरी परिक्षेत्रात अडकलेल्या प्रिन्सेस डायमन्ड या क्रुझमधून श्रीलंकेच्या २ आणि नेपाळच्या १ नागरिकाला बाहेर काढले आहे.
@@AUTHORINFO_V1@@