कोरोनाचा सामना करण्यासाठी ‘प्राणवायू’ !

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    03-Apr-2020
Total Views |


rorkee iit_1  H




नवी दिल्ली : संपूर्ण जग कोरोना महासाथीचा सामना करण्यासाठी लढत असताना भारतातदेखील डॉक्टर्स आणि अभियंते त्यात सहभागी झाले आहेत. आयआयटी रूरकी आणि एम्स ऋषिकेश यांनी आपल्या संयुक्त प्रयत्नांतून खास कोरोना रुग्णांसाठी उपयोगी ठरणाऱ्या पोर्टेबल व्हेंटीलेटर – ‘प्राणवायू’ची निर्मिती केली आहे.

 

कोरोनाविरोधातील लढ्यामध्ये सर्वांत महत्वाची भूमिका आहे ती जीवरक्षक प्रणालीची म्हणजेच व्हेंटीलेटरची. देशातील व्हेंटीलेटर्सची सुविधा लक्षात घेता केंद्र सरकारने खासगी आणि सरकारी उत्पादकांना व्हेंटीलेटर्सची निर्मिती करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यात टाटा आणि महिंद्रा या उद्योगसमुहांनीदेखील रस दाखविला आहे. एकुणच सर्वजण एकत्रिपणे काम करीत असताना आयआयटी रूरकी आणि एम्स – ऋषिकेश यांनीदेखील उल्लेखनीय कामगिरी बजाविली आहे.

 

आयआयटी रूरकीमधील प्राध्यापक अक्षय द्विवेदी आणि प्रा. अरुण कुमार तसेच एम्स ऋषिकेशमधील डॉक्टर देवेंद्र त्रिपाठी या तिघांनी मिळून पोर्टेबल व्हेंटीलेटरची निर्मिती केली आहे. त्यास त्यांनी ‘प्राणवायू’ असे नाव दिले आहे. केवळ एका आठवड्यापूर्वी कोरोना महासाथीमध्ये लोकांची मदत करण्यासाठी क्विक टाइम तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी एक गट बनविला होता. त्यातच पोर्टेबल व्हेंटीलेटर तयार करण्याची कल्पना पुढे आली आणि लॉकडाऊनच्या काळातच त्यावर काम सुरू झाले. आयआयटी रूरकीच्या टींकरिंग लॅबमधील सोयीसुविधांचा त्यासाठी उपयोग करण्यात आला. संशोधनाअंती पोर्टेबल व्हेंटीलेटर बनविण्यात तज्ज्ञांना यश आले. यामध्ये रूग्णाच्या गरजेनुसार प्राणवायू देण्यासाठी प्राईम मुव्हर प्रक्रियेचा वापर करण्यात आला आहे. ही प्रक्रिया श्वासोच्छवासाप्रमाणे प्राणवायूचा दाब आणि वेग नियंत्रित करते. यामध्ये प्रतिमिनीट श्वास नियंत्रित करण्याचीदेखील सुविधा असून यासाठी कंप्रेस्ड हवेची आवश्यकता नाही.

 

टिंकरिंग लॅबचे समन्वयक प्रा. द्विवेदी म्हणाले की, कोरोना महासाथ ध्यानात घेऊन ‘प्राणवायू’ विकसित करण्यात आले आहे. याच्या निर्मितीमध्ये वेळ आणि खर्च दोहोंची बचत होते आणि याच्या विश्वासार्हतेविषयीदेखील शंका नाही. आम्ही एका फुप्फुसावर याची चाचणी केली असून त्यात त्याची कार्यक्षमता सिद्ध झाली आहे. सदर व्हेंटीलेटर लहान मुलांसह प्रौढांसाठीही करता येणार आहे. आयआयटीची रूरकीचे संचालक प्रा. अजित चतुर्वेदी म्हणाले की, प्राणवायूला सीआयआयतर्फे आयोजित एका वेबिनारमध्ये (ऑनलाईन संमेलन) ४५० हून देशांसमोर प्रदर्शित करण्यात आले आहे. त्याच्या उत्पादनात अनेक उद्योगांनी रस दाखविला आहे. त्यामुळे कोरोनाटा सामना करण्यामध्ये ‘प्राणवायू’ अतिशय महत्वाची भूमिका बजाविणार आहे, असेही चतुर्वेदी यांनी सांगितले.

 
 
@@AUTHORINFO_V1@@