धारावीतील डाॅक्टरलाच कोरोनाची लागण

03 Apr 2020 13:19:11
dharavi _1  H x

३५ वर्षीय डाॅक्टर कोरोना बाधित

मुंबई (प्रतिनिधी) - आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी समजली जाणारी धारावी झोपडपट्टी कोरोना व्हायरसच्या फैलावाचा केंद्रबिंदू तयार झाली आहे. धारावीतल्या मुख्य रस्त्यावर दवाखाना असलेल्या ३५ वर्षीय डाॅक्टरला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. त्याची तपासणी पाॅझिटिव्ह आली आहे. कोरोनाची लागण झालेला ही तिसरा रुग्ण धारावीत सापडला आहे.
 
 
१ एप्रिल रोजी धारावी झोपडपट्टी पुनर्वसन इमारतीत राहणारा ५६ व्यक्ती कोरोना बाधित आढळला. त्याच दिवशी त्याच्या मृत्यू झाला. धारावीत त्याचे कपड्याचे दुकान होते. गुरुवारी सकाळी धारावीमध्ये स्वच्छतेचे काम करणाऱ्या महापालिकेच्या सफाई कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण झाल्याचे उघड झाले. आज धारावीमध्ये दवाखाना असलेल्या डाॅक्टरची कोरोना तपासणी पाॅझिटिव्ह आली आहे. त्याचा कुटुंबाला विलग करण्यात आले असून उद्या त्याची कोरोना चाचणी होईल, असे महापालिकेच्या अधिकाऱ्याने सांगितले. महापालिकेचे अधिकारी या डाॅक्टरच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचा शोध घेत आहेत. तसेच तो राहत असलेली इमारत सील करण्यात आली आहे.
 
 
धारावीमध्ये कोरोनाचे वाढते संक्रमण चिंताजनक आहे. कारण, या परिसरात दहा लाखाहून अधिक लोक राहतात. धारावीचे दर चौरस मैलांवर ८.६९ लाख लोक आहेत आणि त्यामुळे कोरोना संक्रमणाचा धारावी हे हाॅटस्पाॅट ठरू शकते.
Powered By Sangraha 9.0