ब्रिटीशकालीन ‘अमृतांजन’ पूल होणार इतिहासजमा!

03 Apr 2020 11:11:00

amrutanjan bridge_1 


लॉकडाऊनच्या काळात १९० वर्षे जुना मुंबई-पुणे मार्गावरील अमृतांजन पूल पाडणार

मुंबई : पुणे द्रुतगती मार्गावरील १९० वर्षे जुना अमृतांजन पूल लॉकडाऊनच्या काळात पाडण्यात येणार आहे. लॉकडाऊनमुळे या मार्गावरील वाहनांची संख्या घटल्यानं ४ एप्रिल ते १४ एप्रिल या काळात अमृतांजन पूल पाडण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने घेतला आहे.


मुंबई-पुणे जुन्या महामार्गावर खंडाळा घाटात १८३० साली हा पूल बांधण्यात आला होता. ब्रिटीश कालावधीत कॅप्टन ह्युजनस यांनी पुलाचे बांधकाम केले होते. आता नव्या मुंबई-पुणे महामार्गामुळे या पुलाचा फारसा वापर होत नव्हता, अशी माहिती रायगड पोलिसांनी दिली. मात्र या पुलाच्या खाली मोठी अवजड वहाने अडकून असायची त्यामुळे वाहतूक कोंडी व्हायची. हा पूल पाडल्याने ही कोंडी कमी होण्यास मदत होणार आहे.


पूल पाडण्यात येणाऱ्या कालावधीत मुंबई-पुणे मर्गावरील वाहतूक ही अंडा पॉईंटकडून जुन्या महामार्गावरुन खंडाळा-लोणावळा शहरातून लोणावळा एक्झिटपर्यंत होईल. पुणे-मुंबई मार्गावरील वाहतूक ही लोणावळ एक्झिट येथून जुन्या महामार्गावरुन लोणावळा- खंडाळामार्गे वळवण्यात येईल.


कॅप्टन ह्युजनस यांनी एका वर्षांत या पुलाचे बांधकाम पूर्ण केले. हा पूल नंतर मुंबई आणि पुणे या दोन शहरांना जोडणारा महत्त्वाचा दूवा ठरला होता. या पुलाजवळ पूर्वी अमृताजंन वेदनाशामक बामाची मोठी जाहिरात केली होती. तेव्हापासून या पुलाला अमृतांजन नाव पडले.
Powered By Sangraha 9.0