मुंबई विमानतळावरील ११ जवान कोरोना पाॅझिटिव्ह

03 Apr 2020 19:13:25
cisf_1  H x W:

१४२ जवानांचे विलिगीकरण

 
मुंबई (प्रतिनिधी) - मुंबई विमानतळावर सुरक्षेसाठी तैनात असलेल्या ११ जवानांना कोरोनाची लागण झाल्याचे उघड झाले आहे. काही दिवसांपासून विमानतळावरील सीआयएसएफच्या १४२ जवानांचे विलिगीकरण करण्यात आले होते. त्यामधील ११ जवानांचा कोरोना चाचणी अहवाल पाॅझिटिव्ह आला आहे.
 
 
 
मुंबई विमानतळावर सुरक्षेसाठी सीआयएसएफचे जवान तैनात असतात. आता याच जवानांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. गेल्या आठवड्यात विमानतळावरील सीआयएसएफच्या जवानामध्ये कोरोनाची लक्षणे आढळली होती. यामुळे प्रशासनाने १४२ जवानांचे विलिगीकरण केले होते. त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली होती. काल त्यामधील चौघांचे आणि आज सहा जणांचे अहवाल पाॅझिटिव्ह आल्याचे सीआयएसएफकडून सांगण्यात आले आहे. परदेशातून कोरोना संक्रमित होऊन आलेल्या नागरिकांमुळे या जवानांना कोरोनाची लागण झाल्याची शक्यता आहे. यामधील तपासणी करण्यात पहिल्या जवानाची पहिलीच कोरोना तपासणी पाॅझिटिव्ह आली होती. मात्र,दुसरी चाचणी नेगिटिव्ह आली. आता प्रशासनाने तिसऱ्यांदा चाचणी करण्यासाठी नमूने पाठवले आहेत.
Powered By Sangraha 9.0