पाकिस्तानकडून युद्धबंदीचे उल्लंघन

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    03-Apr-2020
Total Views |
pakisthan_1  H
 
 

जम्मू काश्मीर मधील कृष्णा घाटीत गोळीबार

 
मुंबई (प्रतिनिधी) - पाकिस्तानने आज सायकांळी पुछं सेक्टरमधील कृष्णा घाटीमध्ये गोळीबार केला. त्यामुळे दोन देशांमधील युद्धबंदीचे उल्लघंन पुन्हा एकदा पाकिस्तानकडून झाले आहे.
 
 
 
भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही देश सध्या कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या परिस्थितीशी लढत आहेत. दोन्ही देशांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. कोरोना ग्रस्तांच्या आकडेवारीत पाकिस्तान हा भारतापेक्षा पुढे आहे. अशा परिस्थितीत आज सायंकाळी ५.३० वाजता युद्धबंदीचे उल्लंघन केले. जम्मू काश्मीरच्या पुछं सेक्टरमधील कृष्णा घाटीमध्ये लाईन आॅफ कंट्रोलवर पाकिस्तानकडून गोळीबार करण्यात आला.
@@AUTHORINFO_V1@@