हा मराठी उद्योजक राज्याला देणार १५ लाख गोळ्या मोफत

    दिनांक  29-Apr-2020 20:33:27
|

Rubicon _2  H x
 
 अंबरनाथ : जगभरात थैमान घालणाऱ्या कोरोनावर (कोविड-19) काही प्रमाणात नियंत्रण आणण्यासाठी हायड्रोक्सीक्लोरीक्वीनच्या गोळ्यांचा उपयोग होत आहे. राज्यातील सध्याची परिस्थिती पाहता एका मराठी उद्योजकांने पुढे येत सरकारला १५ लाख गोळ्या मोफत देण्याचा निर्णय घेतला आहे. अंबरनाथच्या आनंदनगर एमआयडीसीतील सुमंत पिळगावकर, यांच्या या निर्णयाचे राज्यभरातून स्वागत केले जात आहे.
 
 
 

Rubicon _3  H x 
 
 
 
 
 
 
कोरोनाशी लढा देण्यासाठी अमेरिकेलाही भारतातील हायड्रोक्सीक्लोरीक्वीन गोळ्यांची गरज लागली. याच हायड्रोक्सीक्लोरीक्वीनच्या गोळ्या अंबरनाथच्या आनंदनगर एमआयडीसीमधील सुमंत पिळगावकर यांच्या रुबीकॉन कंपनीत तयार केल्या जात आहेत. कोरोनाविरोधात लढा देण्यासाठी लागणाऱ्या गोळ्या महाराष्ट्र सरकारला मोफत पुरवल्या जाणार असल्याचे रुबीकॉन कंपनीचे मालक पिळगावकर यांनी सांगितले.
 


Rubicon _6  H x

 
रुबीकॉन कंपनीचे मालक सुमंत पिळगावकर यांनी दोन वर्षांपूर्वी अमेरिकेच्या बाजारात हायड्रोक्सीक्लोरीक्वीनच्या गोळ्यांना असलेल्या मागणीमुळे दोन वर्षांपूर्वी त्याचा फॉर्म्युला तयार केला. मात्र नंतर काही कारणामुळे उत्पादन होऊ शकले नाही. त्यावेळी मागावलेला कच्चा माल कंपनीत पडून होता.

कोरोनाने जगभरात थैमान घातल्यानंतर या गोळ्यांचे उत्पादन करण्याचा निर्णय घेतला, मात्र पैसे कमावण्यासाठी म्हणून नव्हे तर या गोळ्या फक्त महाराष्ट्र सरकारला मोफत दिल्या जाणार आहेत, आत्तापर्यंत अशा एक लाख गोळ्या रुबीकॉन कंपनीनं दिल्या असून भविष्यात एकूण १५ लाख गोळ्या सरकारला देण्याचा कंपनीचा निर्धार असल्याचे सुमंत पिळगावकर यांनी सांगितले.


Rubicon _5  H x
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.