मजुर, विद्यार्थी आणि पर्यटकांना घरी जाण्यास परवानगी

29 Apr 2020 19:49:30


migrant students_1 &




नवी दिल्ली : देशातील विविध भागांमध्ये अडकलेले स्थलांरीत मजुर, विद्यार्थी आणि पर्यटकांना आपापल्या राज्यांमध्ये परतण्यास परवानगी देण्यात आली आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाने सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना तसा आदेश बुधवारी जारी केला आहे. आपापल्या राज्याच्या नागरिकांना परत आणण्यासाठीचा प्रोटोकॉल तयार करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

 

कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी देशात लॉकडाऊन लागू करण्यात आले आहे. या निर्णयामुळे कामानिमित्त अन्य राज्यांमध्ये गेलेले स्थलांतरीत मजुर, शिक्षणानिमित्त गेलेल विद्यार्थी आणि पर्यटक हे तेथेच अडकन पडले आहेत. मजुरांसह विद्यार्थी आणि पर्यटकांना स्वगृही परतण्याची सोय करण्यात यावी, अशी मागणी मोठ्या प्रमाणावर करण्यात येत होती. विविध राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनीदेखील पंतप्रधानांसोबतच्या चर्चेमध्ये हा मुद्दा अधोरेखीत केला होता.

 

सदर विषयाचे गांभिर्य ध्यानात घेऊन केंद्रीय गृहमंत्रालयाने अखेर मजुर, विद्यार्थी आणि पर्यटकांना आपापल्या राज्यांमध्ये परत नेण्यासाठीचे आदेश राज्ये व केंद्रशासित प्रदेशांना जारी केले आहेत. त्यासाठी राज्यांना प्रोटोकॉल तयार करण्याचे आणि राज्यांना परस्परांशी समन्वय साधण्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे ३ मे नंतर लॉकडाऊनचा कालावधी वाढविण्यात आला तरी आता मजुर आणि विद्यार्थ्यांच्या समस्या बऱ्याच प्रमाणात कमी होणार आहेत.

 

गृहमंत्रालयाच्या आदेशानुसार, ;

 

१. राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना यासाठी नोडल अधिकारी नेमण्याचे आणि आपापल्या राज्यांमधील स्थलांतरीतांची नोंदणी करण्याचे सांगण्यात आले आहे. ज्या राज्यांमध्ये अशा प्रकारची वाहतुक होणार आहे, त्यांना परस्परांशी समन्वय साधण्याचे आदेश दिले आहेत.

 

२. प्रवासास सुरूवात करण्यापूर्वी प्रत्येकाचे स्क्रिनिंग करणय्त येईल. कोरोनाची लक्षणे आढळल्यास त्यांना जाण्याची परवानगी देण्यात येणार नाही.

 

३. वाहतुकीसाठी बसेसचा वापर करता येईल. गाड्यांना निर्जंतुक केल्यानंतर सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन करण्यात येईल.

 

४. कोणतेही राज्य आपल्या सीमेमध्ये प्रवेश करण्यास आणि राज्यातून पुढे जाण्यास रोखू शकत नाही.

 

५. इच्छित स्थळी पोहोचल्यानंतर स्थामिक आरोग्य प्रशासनाकडून प्रवाशांची तपासणी करण्यात येईल आणि त्यांना होम क्वारंटाईन व्हावे लागेल. आवश्यकता भासल्यास त्यांना रुग्णालये अखखवा आरोग्य केंद्रांमध्ये भर्ती व्हावे लागेल. वेळोवेळी त्यांची आरोग्य तपासणी होईल.

 

६. त्यांना आरोग्य सेतू या एप्लिकेशनचा वापर करणे बंधनकारक असेल.

 
 
 
Powered By Sangraha 9.0