ज्या चित्रपटाचे तिकीट खरेदी करण्याचे पैसे नव्हते; त्यात मिळाला मोठा रोल

    दिनांक  29-Apr-2020 15:00:56
|
Imran Khan_1  H
 


मुंबई : स्ट्रगल काय असतं हे इरफान खान यांच्या एका मुलाखतीत दिसून येतं. अत्यंत शांत पण अभिनयाने तितकाच बोलका कलाकार आज सिनेसृष्टीने गमावला पण, जगणं काय असतं, हे त्यानेच अनेकदा आपल्या स्वभावातून दाखवून दिलं. २०१५ मध्ये एक ज्युरासिक पार्क नावाची चित्रपटांच्या सिरीजमध्ये महत्वाची भूमीका निभावली होती. याच दरम्यान, एका मुलाखतीत त्याने उत्तर दिले होते कि, 'माझं एक स्वप्न होते ते आज पूर्ण झाले आहे. कधीकाळी ज्या चित्रपटांना पाहण्यासाठी माझ्याकडे पैसे नव्हते त्याच चित्रपटामध्ये मी एक मोठी भूमीका साकारतोय.'
 
 
 
 
एका अष्टपैलू अभिनेत्याला भारतीयच नव्हे तर हॉलीवूड मुलके आहे. इरफान यांच्या जाण्याने सिनेजगतासह त्यांचे फॅन्स दुःखी आहेतच मात्र, चांगला सिनेमा आणि विषय पाहणारा एक मोठा प्रेक्षकवर्गही शोक व्यक्त करत आहे. ५४ वर्षीय इरफान त्या कलाकारांपैकी एक आहे, ज्याची लहानातली लहान कलाकृतीही प्रेक्षकांना भावते. इरफान त्या काही लोकांपैकी एक आहे, त्याने जी स्वप्ने पाहिली ती पूर्ण केली.
 
 
 
२०१३मध्ये इरफानला पान सिंह तोमर या चित्रपटासाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. मात्र, 'हासिल' आणि 'नेमसेक' या चित्रपटांसाठी मला पुरस्कार मिळायला हवा, असे म्हणत त्याने पुरस्कार स्वीकारल्यानंतरची प्रतिक्रीया दिली. सो पण माझे स्वप्न पूर्ण झाले, असेही तो म्हणाला. राष्ट्रीय पुरस्कार हा आजही विश्वसनीय आहे. तो मिळणे माझ्यासाठी भाग्य आहे.', इरफान यांच्या जाण्याने जी पोकळी अभिनयाच्या क्षेत्रात निर्माण झाली ती भरून न निघणारी आहे.
 
 
 
इरफान यांच्यावर उपचार अशक्य होते ?
 
ट्युमर शरीराच्या एका भागातून दुसरीकडे पसरू शकतो, सुरुवातीला त्याची माहिती मिळू शकत नाही. त्यामुळे इलाजही लवकर होत नाही. दुसऱ्या प्रकारचा ट्युमर म्हणजे शरीराच्या इतर भागात प्रभाव टाकत नाही तो एकाच जागी वाढतो. शस्त्रक्रीयेद्वारे दुसऱ्या प्रकारचा ट्युमर काढला जाऊ शकतो.इरफान खान यांना न्‍यूरो-एंडोक्राइम ट्यूमर होता. याच्या उपचारासाठी ते लंडनमध्येही गेले होते. अँडो-क्राइन सिस्‍टम कित्येक पेशींपासून बनते. त्यामुळे कित्येक प्रकारचे हार्मोन्स रासायनिक पदार्थ तयार होतात. शरीरात रक्तावाटे जाऊन पेशींवर प्रभाव टाकत असतात.न्‍यूरो-एंडोक्राइन पेशी संपूर्ण शरीर जसे आतड्या आणि पोटासारख्या भागात पसरतात.


आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.