अरबी हल्ल्याचे आवताण

    दिनांक  29-Apr-2020 23:06:41
|


जफरुल इस्लाम खान_1 &


अठराव्या शतकात मराठ्यांचा भगवा जरीपटका हिंदुस्तानभर दौडत होता, तेव्हा इराणच्या अहमदशहा अब्दालीला भारतावर आक्रमण करण्याचे आमंत्रण शाह वलीउल्ला दहलवीने दिले होते. आज त्याचाच आदर्श सांगणार्‍या जफरुल इस्लाम खान याने तसेच कृत्य केले असून भारताला व हिंदूंना अरबी व मुस्लीम देशांच्या हल्ल्याची धमकी दिली.भारताच्या दुसर्‍या फाळणीचे विकृत स्वप्न पाहणार्‍या देशविघातक विषवल्ली आजही अस्तित्वात असून त्या अधूनमधून गरळ ओकताना दिसतात. कोणी जम्मू-काश्मीर व लडाखला
, तर कोणी पूर्वोत्तराला, तर कोणी दक्षिणेला भारतभूपासून तोडण्याचे मनसुबे रचतो, तर कोणी रशियन वा चिनी कम्युनिस्ट भारतावर हल्ला करुन इथे साम्यवादी शासनव्यवस्था स्थापित करतील, असा कुविचार करतो. नक्षलवादी, माओवादी आणि त्यांच्या शहरी पाठीराख्यांचे टोळके तर देशाचे तुकडे तुकडे व्हावेत, यासाठी सातत्याने कारस्थाने करत असतात. त्यातली काही उघड होतात, तर काहींचा पत्ता सर्वसामान्यांना कधी लागतही नाही. आता त्यात आणखी एकाची भर पडली असून त्याचे नाव जफरुल इस्लाम खान. दिल्लीच्या अल्पसंख्याक आयोगाचा हा इसम अध्यक्ष असून मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी त्याची नियुक्ती केलेली आहे. जफरुल इस्लाम खानने आपल्या फेसबुक खात्यावरुन एक पोस्ट (तसेच कुवेतला पत्र पाठवले आहे) शेअर केली असून त्यावरुन त्याला देशद्रोह्याशिवाय अन्य कोणतेही विशेषण लावता येणार नाही, इतकी ती संतापजनक, धक्कादायक आणि चीड आणणारी आहे.तो म्हणतो की
, “भारतीय मुस्लिमांना साथ देण्यासाठी सर्वप्रथम कुवेतचे धन्यवाद! हिंदूंनी विचार केला की, अरब आणि मुस्लीम देश मोठा आर्थिक फायदा पाहता भारतातील मुस्लिमांवरील अन्याय-अत्याचाराची पर्वा करणार नाहीत. पण, हिंदुत्ववादी कट्टरपंथी विसरले की, भारतीय मुस्लिमांनी शतकानुशतकांपासून इस्लामच्या भल्यासाठी सेवा केली आणि म्हणूनच अरब व मुस्लीम जगतात त्यांचा सन्मान केला जातो. इस्लामी आणि अरबी विज्ञानविश्वात त्यांची अग्रणी भूमिका असून जागतिक वारशात त्यांचे विशाल सांस्कृतिक योगदान आहे. शाह वलीउल्ला दहलवी, मोहम्मद इक्बाल, अबुल हसन नदवी, वहीउद्दीन खान आणि झाकीर नाईक यांसारखी नावे अरब आणि इस्लामी देशांत लोकप्रिय आहेत. हिंदुत्ववाद्यांनो लक्षात ठेवा, भारतीय मुस्लिमांनी आतापर्यंत अरब देश आणि जगातील मुस्लिमांसमोर तुमच्या द्वेषप्रसारक मोहिमेची, झुंडहत्येची आणि दंगलींची तक्रार केलेली नाही. परंतु, ज्या दिवशी इथले मुस्लीम त्यांच्याकडे तशी तक्रार करतील, त्या दिवसानंतर तुम्हाला रोरावणार्‍या, घोंघावणार्‍या वादळाचा सामना करावा लागेल.भारतातच राहून
, इथल्या सोयी-सुविधांचा लाभ घेऊन इतर देशांची तळी उचलणार्‍या औलादींची कमतरता आपल्याकडे नव्हतीच आणि नाहीही. त्यातूनच देशातल्या अनेक भागात मिनी पाकिस्ताननिर्माण झाल्याचे आणि भारताचे काही बरेवाईट झाले तर फटाके फोडणार्‍यांचे जत्थे तयार झाले व पुढे चालून त्यातल्या काहींनी दहशतवाद्यांसाठी स्लीपर सेलम्हणूनही काम केले. त्यापेक्षा निराळ्या सामाजिक व राजकीय स्तरावरील लोकांनी थेट पाकिस्तानात जाऊन स्वदेशातील सत्तापालटासाठी मदतीची भीकही मागितली. तसेच स्वतःला बुद्धिजीवी, विचारवंत म्हणवून घेणार्‍यांनी पाकिस्तानचे, तिथल्या लष्कराचे, फुटीरतावाद्यांचे-दहशतवाद्यांचे गुण आवडीने गायल्याचेही आपण याआधी पाहिले आहे. आताचा प्रकारही काहीसा तसाच असला तरी जफरुल इस्लाम खानने भारताला व देशातील 100 कोटींपेक्षा अधिक हिंदूंना उघड उघड धमकी दिल्याचे स्पष्ट होते. हिंदुत्ववाद्यांनो, औकातीत राहिलात तर ठीक अन्यथा अरबी-मुस्लीम देशांकडे तुमच्यावर हल्ला करण्यासाठी तक्रार करु,” असा त्याच्या विधानांचा अर्थ आहे. जफरुल इस्लामने आपल्या पोस्टमध्ये ज्या शाह वलीउल्ला दहलवीचा उल्लेख केला, त्याचा इतिहासही देशविरोधीच आहे.अठराव्या शतकात मराठ्यांचा भगवा जरीपटका हिंदुस्थानभर दौडत होता
, फडकत होता तेव्हा इराणच्या अहमदशहा अब्दालीला भारतावर आक्रमण करण्याचे आमंत्रण शाह वलीउल्ला दहलवीनेच दिले होते. पुढे अब्दाली आला आणि असंख्य हिंदू मंदिरांचा, हिंदू स्त्री-पुरुष-बालकांचा विध्वंस, विच्छेद करुन गेला. असा शाह वलीउल्ला दहलवी जफरुल इस्लाम खानचा आदर्श आहे. झाकीर नाईकचे नावही त्याने आपल्या पोस्टमध्ये घेतले असून मूलतत्त्ववादी इस्लामच्या प्रचार-प्रसार व दहशतवाद्यांशी संबंधाच्या आरोपावरुन तो भारतातून परागंदा झालेला आहे. मुस्लीम युवकांना दहशतवादाच्या, इसिसच्या खाईत लोटण्याचाही झाकीर नाईकवर आरोप आहे. जफरुल इस्लाम याच झाकिर नाईकच्या साह्याने मुस्लीम देश भारतावर चाल करुन येतील, अशी दर्पोक्ती करत आहे. तसेच यातून भारताची जागतिक पातळीवर बदनामी करण्याचे कामही त्याने केल्याचे स्पष्ट होते.केंद्र सरकारने
नागरिकत्व सुधारणा कायदापारित केला. त्यावेळीही जफरुल इस्लामने विरोध केला होता. तत्कालीन सरन्यायाधीश एस. ए. बोबडे यांना पत्र पाठवून सरकार व पोलिसांवर खोटे-नाटे आरोपही त्याने केले होते. एकूणच जफरुल इस्लामच्या आताच्या कुवेतला पत्र पाठवण्यातून व त्यासंबंधी फेसबुकवर पोस्ट लिहिण्यातून आणि गेल्या काळातील कृत्यांवरुन त्याच्या मनात भारत व हिंदूंबद्दल कमालीचा द्वेष, तिरस्कार भरल्याचेच सिद्ध होते. तरीही अशा व्यक्तीला अरविंद केजरीवाल अल्पसंख्याक आयोगाच्या अध्यक्षपदी बसवतात! तसेही केजरीवाल दिल्ली विधानसभेची निवडणूक जिंकल्यानंतर जामा मशिदीच्या इमामांनी जल्लोष केलाच होता म्हणा. त्यांनी दिल्लीत पुन्हा मुस्लीम राज्य आल्याचा दावा केल्याची माहितीही मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाली होती. म्हणूनच कदाचित अन्य देशांनी भारतावर हल्ला करण्याचे आवताण देऊनही अरविंद केजरीवालांनी जफरुल इस्लामला अजूनही अल्पसंख्याक आयोगाच्या अध्यक्षपदावरुन दूर केलेले नसावे. मुस्लिमांच्या गठ्ठा मतपेटीसाठी काहीही, हे अरविंद केजरीवालांचे यामागचे धोरणही यातून दिसून येते. भारतीय लोकशाही समोरील धोका हीच जफरुल इस्लाम आणि त्यांना सन्मानाने पदांची खैरात वाटणारी लोकं आहेत.जफरुल इस्लामची तर देशात धार्मिक दंगली उसळाव्यात
, मुस्लीम समाजाने पेटून उठावे, अशीच इच्छा असल्याचे त्याच्या पोस्टवरून दिसते. व्हिक्टीम कार्डखेळून भारतात मुस्लिमांवर किती अन्याय होतो, हे सांगण्याचाही त्याचा डाव असल्याचे समजते. खरे म्हणजे भारताइतका मुस्लिमांसाठी स्वर्गाहून सुंदर देश कोणताच नसेल! इथे तबलिगीजमातीच्या नतद्रष्टांनी कोरोनाप्रसारात मोठा वाटा उचलला तरी त्यांच्यावर वैद्यकीय उपचार केले जातात आणि शाहीनबागेतील बेकायदेशीर आंदोलनही दीड-दोन महिन्यांपर्यंत चालू राहते. एखाद्या गुन्ह्यातील आरोपी मुस्लीम नाही, हे सांगायला राज्याचा गृहमंत्री जनतेसमोर येतो. दहशतवादी हल्ला करणार्‍या अजमल कसाबलाही न्यायोचित मार्गानेच शिक्षा दिली जाते. राष्ट्रपती-उपराष्ट्रपतीपदीही मुस्लीम व्यक्ती विराजमान होते. तसेच तत्कालीन पंतप्रधान देशातील साधनसंपत्तीवर पहिला अधिकार मुस्लिमांचा असेही म्हणतात. तरीही अन्याय, अत्याचार आणि असहिष्णुतेची बोंब मारत जर जफरुल इस्लामसारखे लोक परदेशी शक्तींना भारतात हस्तक्षेपाची विनंती करत असतील तर त्याचा फटका त्या संपूर्ण समाजालाही बसू शकतो, हे त्याने लक्षात घेतले पाहिजे. कारण क्रियेला प्रतिक्रिया ही असतेच व ती कोणते रुप घेईल, याचा अंदाज कोणीही लावू शकत नाही.दरम्यान
, जफरुल इस्लामच्या धर्मवेडातून उपजलेल्या विखारावर छद्मपुरोगामी, छद्मधर्मनिरपेक्षवादी किंवा तथाकथित संविधान-लोकशाही रक्षकांनी प्रतिक्रिया दिल्याचे दिसत नाही, कोणी छाती बडवली नाही की गळे काढले नाही. अर्थात, जफरुल इस्लाम खानचा धर्म या लोकांच्या आड येत असणार, तिथेच जर कोणी हिंदुत्ववादी असता तर या लोकांनी आतापर्यंत थयथयाट सुरु केला असता. हिंदू दहशतवादम्हणत बेंबीच्या देठापासून आरडा-ओरडा केला असता. पण, आता त्यांच्या आवडत्या समुदायातील व्यक्ती समोर आहे, त्यामुळे ही लोकं त्याविरोधात चकार शब्दही काढणार नाहीत. उलट जफरुल इस्लामवर अरबी आणि मुस्लीम देशांकडे हात पसरण्याची वेळ का आली, हे सांगण्यासाठी ते आपल्यापुढे येतील.जफरुल इस्लाम कसा निर्दोष हे पटवून देण्यासाठी हे ढोंगबाज लेख खरडतील
, व्हिडिओ तयार करतील. कारण, त्यांचा इतिहासच तुकडे तुकडे गँगचे समर्थन करण्याचा आहे, ते तसेच वागतील. पण, जफरुल इस्लाम खान किंवा इतरांनीही हे लक्षात घ्यावे की, तुमच्या खोट्या अफवा पसरवणार्‍या पत्रांनी इकडची काडी तिकडे होण्यासारखीही सध्याची परिस्थिती नाही. कारण, तेलाचे दर गडगडले असून देश चालवण्यासाठी धर्मांधता नव्हे, तर पैशाचीच आवश्यकता असते आणि ही बाब अरबी-मुस्लीम देशांनाही लागू होते. तसेच परराष्ट्र मंत्रालयानेही याबाबत स्पष्टीकरण दिले असून कुवेतने आम्ही भारताच्या अंतर्गत प्रकरणांत हस्तक्षेप करणार नाही, असे भारताला कळवले आहे. त्यामुळेच धर्मवेडाच्या अंमलावरुन कुवेत वगैरेंकडे आशेने पाहणार्‍यांनी व त्यांच्या जीवावर भारताला किंवा हिंदूंना धमक्या देणार्‍यांनी तोंड झोडून घ्यावे, तेच त्यांच्या हिताचे असेल.

आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.