‘त्या’ वेदना मी जाणतो ; इरफानच्या जाण्याने युवी झाला भावूक

    दिनांक  29-Apr-2020 18:10:48
|

yuvraj_1  H x W
मुंबई : दिग्गज हिंदी चित्रपट अभिनेता इरफान खान याची अखेर प्राणज्योत मालवली. त्याने गेली २-३ वर्षे कर्करोगाशी सामना केला. २९ एप्रिलला त्याचा कोलन इन्फेक्शनमुळे मृत्यू ओढवला. यानंतर कर्करोगाशी सामना करत बाहेर आलेल्या माजी क्रिकेटपटू युवराज सिंगने देखील आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. इरफान खान याच्या अकाली जाण्याने त्याने हळहळ व्यक्त केली.
 
 
 
 
युवराजने ट्विटच्या माध्यमातून इरफान यांना श्रद्धाजली वाहिली. त्यामध्ये तो म्हणाला आहे की, “मला तो प्रवास माहित आहे, मला त्या वेदना माहित आहेत आणि मला हेही माहित आहे, की तू अखेरपर्यंत संघर्ष केलास. काही जण यावर मात करतात, पण काही जणांना ते शक्य होत नाही. इरफान तू आता नक्कीच चांगल्या ठिकाणी असशील, अशी मला आशा आहे.”
 
 
 
 
क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर, विराट कोहली, विरेंद्र सेहवाग, मोहम्मद शामी, अनिल कुंबळे आदि क्रिकेटर्सनी इरफान यांच्याविषयी संवेदना व्यक्त केल्या आहेत. तसेच या दुखा:त आम्ही इरफानच्या कुटुंबियांसोबत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
 
 
 
 
दरम्यान, इरफानच्या जाण्याने बॉलिवूडकरांवरच नाही तर जागतिक सिनेमावर फार मोठा परिणाम होणार आहे. इरफान एक अभिनेता म्हणून तर ते सर्वांचे आवडते होतेच परंतू माणूस म्हणून देखील लोकांना ते तितकेच भावायचे. अनेकदा काही प्रकरणांमध्ये वा मुद्दावर ते आपली परखड मते व्यक्त करत. मात्र त्यांच्या अश्या अकाली जाण्याने सिनेसृष्टी पोरकी झाली आहे.
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.