इरफानच्या निधनाने बॉलिवूडवर शोककळा

    दिनांक  29-Apr-2020 16:35:54
|

irfan_1  H x W:कलाकारांनी वाहिली इरफानला श्रद्धांजली!

मुंबई : इरफान खान यांच्या निधनाची बातमी समोर आल्यानंतर सिनेसृष्टीतील अनेक दिग्गजांनी आपल्या भावना व्यक्त करत श्रद्धांजली वाहिली आहे. वयाच्या ५४ व्या वर्षी मुंबई मधील कोलिकाबेन धीरुभाई अंबानी रुग्णालयात त्याने अखेरचा श्वास घेतला. इरफानच्या जाण्याने संपूर्ण चित्रपटसृष्टीवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. काल त्याला प्रकृती अस्वाथामुळे कोलिकाबेन धीरुभाई अंबानी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. इरफानच्या निधनानंतर समस्त चित्रपट सृष्टीतून त्याला श्रद्धांजली वाहण्यात येत आहे. ट्विटरद्वारे अनेक दिग्गजांनी इरफानच्या आठवणींना उजाळा दिला.

आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.