बॉलिवूड अभिनेता इरफान खान याचे निधन

    दिनांक  29-Apr-2020 12:19:39
|

irfan khan_1  Hकोलन इंफेक्शन झाल्याने इरफान खानचा मृत्यू

मुंबई : बॉलिवूड अभिनेता इरफान खान याचे निधन झाले आहे. वयाच्या ५४ व्या वर्षी मुंबई मधील कोलिकाबेन धीरुभाई अंबानी रुग्णालयात त्याने अखेरचा श्वास घेतला. इरफानच्या जाण्याने संपूर्ण चित्रपटसृष्टीवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. काल त्याला प्रकृती अस्वाथामुळे कोलिकाबेन धीरुभाई अंबानी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. कोलन इंफेक्शन झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. २०१८ मध्ये इरफान खान याला न्यूरोएन्डोक्राईन ट्युमरचे निदान झाले होते. त्यानंतर युके मध्ये त्याच्यावर उपचार सुरु होते. इरफान खान यांच्या प्रकृती अस्वस्थामुळे इंग्रेजी मिडियम या सिनेमाच्या प्रमोशनलाही त्याने हजेरी लावली नव्हती.

त्याच्यावर मागील अनेक दिवसांपासून उपचार सुरु होते. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरु असलेल्या लॉकडाऊनमध्ये मंगळवारी सकाळी त्याची तब्येत अचनाक बिघडली. यानंतर त्याला मुंबईतील कोकिळा बेन रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. प्रकृती गंभीर असल्याने त्याला आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले होते. लॉकडाऊनमुळे लागू असलेल्या निर्बंधांमुळे त्याच्या या नियमित उपचारांमध्ये अडथळा तयार होत होता. दरम्यान, नुकतेच इरफान खानच्या आई सईदा बेगम यांचे निधन झाले होते. त्यावेळी लॉकडाऊनमुळे त्याला आईच्या अंत्यसंस्कारासाठीही जाता आले नव्हते. त्यावेळी इरफानने व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे आईचे अंतिम दर्शन घेतले होते. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी प्रसिद्ध अभिनेते इरफान खान यांच्या निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे. इरफान खान यांचे निधन धक्कादायक आहे. इरफान खान हे सामाजिक जाण असणारे प्रतिभावंत कलाकार होते. आपल्या सशक्त अष्टपैलू अभिनयामुळे त्यांनी अनेक चित्रपट तसेच मालिकांमधील भूमिका संस्मरणीय केल्या. त्यांच्या निधनामुळे हिंदी चित्रपट सृष्टीचे नुकसान झाले आहे. त्यांच्या निधनाचे दुःख सहन करण्याची शक्ती त्यांच्या कुटुंबियांना देवो, ही परमेश्वराकडे प्रार्थना करतो, असे राज्यपालांनी आपल्या शोकसंदेशामध्ये म्हटले आहे.

आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.