पालघर साधू हत्या प्रकरणावेळी कुठल्या बिळात होता ?

28 Apr 2020 20:13:23
sanjay raut_1  
 



मुंबई : पालघरमध्ये दोन साधूंची हत्या ताजी असतानाच उत्तर प्रदेशमध्ये बुलंदशहर जिल्ह्यात पुन्हा दोन साधूंची हत्या झाली. गावातील मंदिरात दोन साधूचे मृतदेह आढळून आले. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी चौकशीचे आदेशही दिले आहेत. मात्र, ही घटना घडल्यावर लगेचच शिवसेना खासदार संजय राऊत यांनी या प्रकरणावरून ताशेरे ओढण्यास सुरुवात केली. पालघर घटनेप्रमाणे बुलंदशहर घटनेला धार्मिक रंग देऊ नका, असे म्हणत अप्रत्यक्षपणे टोला लगावला.


 
 
 
 
 

 
घटना उघडकीस येते न येते तोवर संजय राऊतांची अशी प्रतिक्रीया पाहून नेटकऱ्यांनी त्यांना चांगलेच धारेवर धरले. पालघर घटनेच्या वेळी कोणत्या बिळात लपला होता, असा प्रश्न राऊत यांना विचारण्यात आला आहे. एका नेटक-याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवरही निशाणा साधत पालघरच्या घटनेवेळी मुख्यमंत्र्यांची दोन दिवसानंतर प्रतिक्रिया आली येथे मुख्यमंत्री आदित्यनाथ यांनी तत्काळ आरोपीला अटक व चौकशीचे आदेश दिले आहेत, असेही सांगितले.
 

 
 
 
 
 

 
पालघरची घटना ज्यावेळी घडली त्यावेळी पोलीस उपस्थित होते. बुलंदशहरातील घटना ही एका नशा करणा-या व्यक्तीकडून झाली व पोलिसांनी त्या आरोपीला तत्काळ अटकही केली आहे. अशाप्रकारे राऊतांच्या ट्विटवर संताप व्यक्त करत पालघर आणि बुलंदङराच्या घटनेतील फरक समजावला.
 

 
 
दरम्यान, यापूर्वी राज ठाकरे यांच्यावर अग्रलेखातून केलेल्या टीकेमुळेही मनसैनिकांनी धारेवर धरले होते. राज्यात चिंताजनक परिस्थिती असताना मनसे सरकारच्या पाठीशी उभी असताना राज ठाकरेंवर संजय राऊत यांनी टीका केली होती. या प्रकारामुळे राऊत यांना मनसैनिकांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे.
 

 
 
राऊतांवर शिवसेनेतील फळी नाराज ?
 
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या कोट्यातून आमदार होता यावे यासाठी शिवसेनेतील वरिष्ठ नेत्यांचा गट कामाला लागला आहे. राज्यपाल शिवसेनेच्या बाजूने निर्णय घेतील, अशी या गटाला शक्यता होती. मात्र, संजय राऊत यांनी चुकीच्या वेळी राज्यपालांवर टीका करत राजभवन राजकारणाचा अड्डा बनवू नये, असे म्हटले होते.यामुळे शिवसेनेतील वरिष्ठ नेत्यांसह मुख्यमंत्री उद्धव ठाकरेही त्यांच्यावर नाराज असल्याचे समजते.




 
 


 
‘सोनिया सेना’ झाल्यापासून हिंदुत्व नकली झालंयं : विजया रहाटकर
 
 
संजय राऊतांनी बुलंदशहर घटनेचा हवाला देत पालघर घटनेशी तुलना करत राजकारण नको, असा सल्ला योगी आदित्यनाथ यांना दिला. यावर महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा आणि भाजप नेत्या विजया रहाटकर यांनी राऊतांवर निशाणा साधला. तुमची ‘सोनिया सेना’ झाल्यापासून तुमचं हिंदुत्व नकली झाले आहे, असा टोला त्यांनी राऊतांवर हाणला. “उत्तर प्रदेशातील साधूंच्या हत्येची इतकी चिंता? कदाचित पालघर मधील साधूंच्या मॉब लिंचिंगचीही अशी चिंता झाली असती. उत्तर प्रदेशातील हत्येबद्दल बोलत आहात. परंतु पालघरमधील प्रकरणावर का शांत होता, असा प्रश्नही त्यांनी विचारला.





Powered By Sangraha 9.0