घर चले हम ! जेवण, राहण्याची सोय नसल्याने मजूर निघाले गावाला

    दिनांक  28-Apr-2020 17:42:26
|
Ambernath _1  H


 
 
 
अंबरनाथ : लॉकडाऊनमुळे राहण्याची सोय नाही, सरकारने जेवणाची व्यवस्था केली मात्र, गर्दीमुळे पोटभर जेवण मिळण्याची शाश्वती नाही.
 
 
 
 

Ambernath _2  H 
 
 


खिशात पैसे नाहीत, अशा त्रासाला वैतागून अंबरनाथ एमआयडीसीतील कामगारांनी उत्तर प्रदेशात आपल्या मूळ घराची वाट धरली. काहीही झाले तरीही आम्ही घरी जाऊच चालत जाऊ पण निघून जाऊ, असे सांगत ते पोलीसांच्या भीतीने रात्रीच निघाले.Ambernath _2  H 
 
 
 
 
लॉकडाऊनमध्ये रहायचे कसे, असा सवाल करत आपल्या घरी निघाले. काही अंतरावर पोलिसांनी त्यांना हटकले आणि पुन्हा कामाच्या ठिकाणी पाठवले. मात्र, तरीही आम्ही घरीच जाणार असा निश्चय त्यांनी कायम ठेवला आहे. कुणी कितीही अडवूदे आम्ही चालत घरी जाणार, असे ते वारंवार सांगत आहेत.
Ambernath _2  H 
 
 
 
 
दरम्यान, केंद्राने मजूरांना घरी जाण्यासाठी रेल्वेची व्यवस्था करावी, अशी मागणी राज्य सरकारने केली आहे. मात्र, सध्यातरी मजूरांना आहे तिथेच थांबावे लागेल, असे निर्देश देण्यात आले आहेत. तरीही मजूर आपापल्या गावी जाण्यासाठी रस्त्यावर येत आहेत.
(सर्व छायाचित्रे - श्रीकांत खाड्ये)
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.