चोराच्या उलट्या बोंबा

    दिनांक  28-Apr-2020 22:26:39
|


tablighi markaz_1 &nप्लाझ्मा दानाच्या नौटंकीतून तबलिगीजमातीवाले काही फार मोठे नायक ठरत नाहीत. कारण, जाणूनबुजून सरकारी सूचनांचे उल्लंघन करुन स्वतःच्या वेडेपणापायीच त्यांनी आधी कोरोना पसरवण्यात मोठी भूमिका बजावली. त्यामुळे हा चोराच्या उलट्या बोंबा यासारखाच प्रकार असल्याचे स्पष्ट होते.


संपूर्ण जगासह भारतातही कोरोना विषाणूजन्य महामारीने थैमान घातले आहे. कोरोनाला रोखण्यासाठी केंद्र सरकारने युद्धपातळीवर प्रयत्न करत
लॉकडाऊनचा निर्णयदेखील घेतला. तसेच देशातील प्रत्येक नागरिकासाठी मार्गदर्शक सूचना जारी केल्या, जेणेकरुन कोरोनाचा प्रसार थांबवता येईल. परंतु, ‘तबलिगीजमात या मुस्लीमधर्मीय संघटनेने दिल्लीतील मरकज भवनमध्ये आयोजित केलेल्या धार्मिक कार्यक्रमाने सरकारी प्रयत्नांना, वैद्यकीय-प्रशासकीय-पोलीस यंत्रणेने केलेल्या तयारीला हरताळ फासला. एकाचवेळी हजारो लोक एकत्रित आल्याने आणि त्यांत अनेक कोरोनाबाधित तबलिगीसामील असल्याने तिथून हा विषाणू इतरत्रही वाहून नेला गेला. देशातील प्रारंभीची कोरोना रुग्णांची संख्या आणि तबलिगीजमातीच्या कार्यक्रमानंतर त्यात झालेली वाढ यातून ही बाब अधिक स्पष्टपणे दिसते.एकूण कोरोनाबाधितांपैकी ३० टक्क्यांपेक्षा अधिक रुग्ण
तबलिगीजमतीचे सदस्य असल्याची माहिती केंद्र सरकारच्या पत्रकार परिषदेतूनही समोर आली होती. आता मात्र त्यापैकी काही तबलिगीजमातीच्या कोरोना रुग्णांनी आजारावर मात केल्यानंतर प्लाझ्मा दान करण्याचा निर्णय घेतल्याचे वृत्त काही प्रसारमाध्यमांनी दिले आहे. प्लाझ्माहा आपल्या रक्तातील एक घटक असून रक्तदान केल्यानंतर त्यातून रक्तपेढ्यांतील पृथक्करण यंत्राद्वारे तो वेगळा केला जातो किंवा रक्तदानाच्या क्रियेवेळी दात्याच्या शरीरातून केवळ प्लाझ्मा काढून घेऊन उर्वरित रक्त पुन्हा दात्याच्या शरीरात सोडले जाते. कोरोनाग्रस्त रुग्णांना कोरोनामुक्त झालेल्या व्यक्तीच्या शरीरातील प्लाझ्मा कोरोना विषाणूशी लढण्यात फायदेशीर ठरत असल्याचे म्हटले जात आहे. काही ठिकाणी तर या प्लाझ्मा उपचार पद्धतीच्या साहाय्याने सर्वच्या सर्व कोरोनाबाधित रुग्ण पूर्णपणे बरे झाल्याचेही स्पष्ट झाले आहे. तबलिगीजमातीचे काही सदस्य अशाचप्रकारे प्लाझ्मा दानासाठी तयार असल्याचे वृत्त समोर आले असून हे लोक स्वतःला कोरोना योद्धाम्हणवून घेत आहेत. केंद्रीय अल्पसंख्याक विकासमंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी मात्र तबलिगीजमातीच्या या दांभिकपणावर सडकून टीका केली आहे.कोरोनाचा प्रसार करणारे आता स्वतःला कोरोना योद्धाम्हणवून घेत आहेत. आपण केलेल्या गुन्ह्याबद्दल लाज-शरम वाटण्याऐवजी स्वतःचेच कौतुक करण्यातून ते लाखो कोरोना योद्ध्यांचा अपमान करत आहेत. तथापि, काही राष्ट्रभक्त मुस्लिमांनी गरजूंना नक्कीच प्लाझ्मा दिला आहे. पण, त्यांना तबलिगीसंबोधणे योग्य ठरणार नाही. उलट भारतातील प्रत्येक मुस्लिमाला तबलिगीसिद्ध करण्याचा हा सुनियोजित कट आहे,” असे विधान मुख्तार अब्बास नक्वी यांनी ट्विटरच्या माध्यमातून केले आहे. तबलिगीजमातीला फटकारुन नक्वी यांनी त्यांचा दुटप्पीपणा ठळकपणे समोर आणला, हे बरेच झाले. कारण, ‘तबलिगीजमातीच्या सदस्यांनी जे कृत्य केले ते माणुसकीला काळीमा फासणारेच होते. एकतर कलम १४४लागू असताना एकाचवेळी हजारो लोकांनी एकाच ठिकाणी जमून त्यांनी कायदा धुडकावून लावला.पुढे यातल्याच अनेकांनी मरकज भवनमधून बाहेर येत देशातल्या विविध राज्यातल्या
, शहरांतल्या, गावातल्या मशिदी-मोहल्ल्यांत प्रवेश केला. त्यातूनच त्या भागातल्या रहिवाशांना कोरोनाची लागण झाली. इतकेच नव्हे, तर सरकारी यंत्रणांनी वेळोवेळी आवाहन विनंती करुनही यातले अनेक तबलिगी मशिदींमध्ये किंवा परिचितांच्या घरात लपून बसले. जणू काही देशात प्रत्येक ठिकाणी कोरोनाचा प्रसार व्हावा, हा डावच त्यांनी आखला होता! कोणत्याही सर्वसामान्य व्यक्तीचा संताप व्हावा, अशी कृत्येही या काळात तबलिगीजमातीच्या सदस्यांनी केली. तबलिगींना शोधण्यासाठी वा त्यांच्या चाचणीसाठी ते जिथे आहेत तिथे आलेल्या वैद्यकीय आणि पोलीस पथकावर त्यांनी हल्ले केले, दगडफेक केली. रुग्णालयांमध्ये उपचारासाठी दाखल केल्यानंतर तिथेही या शेफारलेल्या लोकांनी डॉक्टर, परिचारिका आणि सफाई कामगारांना त्रास दिला. आरोग्य कर्मचार्‍यांवर थुंकण्यापासून ते क्वारंटाईनकक्षात विष्ठा करण्यापर्यंतची हीन पातळीही त्यांनी गाठली. तबलिगीजमातीचे सदस्य देशभरात असा उच्छाद घालत असताना त्यांचा म्होरक्या मौलाना साद ऑडिओ क्लिप्सच्या माध्यमातून गरळ ओकतच होता. अशी सगळी दर्जेदार कामे करणार्‍या संघटनेतील काही लोक जर आज प्लाझ्मा दान करुन स्वतःला कोरोना योद्धाम्हणवत असतील, तर त्यांच्यासारखे दुतोंडी कोण असेल? चोराच्या उलट्या बोंबा यासारखाच हा प्रकार असून प्लाझ्मा दानाच्या नौटंकीतून ते काही फार मोठे नायक ठरत नाहीत, हेही स्पष्ट केले पाहिजे. कारण, जाणूनबुजून सरकारी सूचनांचे उल्लंघन करुन स्वतःच्या वेडेपणापायीच त्यांनी आधी कोरोना पसरवण्यात मोठी भूमिका बजावली.तबलिगीजमातीच्या सदस्यांनी कोरोना पसरवण्यात हातभार लावलेला असताना आणि डॉक्टर व पोलिसांवर हल्ले केलेले असताना लिबरल किंवा उदारमतवादी, पुरोगामी, धर्मनिरपेक्षतावाद्यांनी त्यांच्या बचावाचा प्रयत्नही केला. आता प्लाझ्मा दान करणार्‍या प्रत्येक मुस्लिमाला तबलिगीसिद्ध करण्याचा कट तर त्यांनी आखला नाही ना, अशी शंका निर्माण होते आहे. मुख्तार अब्बास नक्वी यांनी या पार्श्वभूमीवर अशाच प्रकारचे मत व्यक्त केले आहे. कोरोना पसरवण्यात आघाडीवर असलेल्या तबलिगींविरोधात देशात संतापाची लाट उसळली होती. परंतु, प्लाझ्मा दान करणारे मुस्लीम तबलिगीच आहेत, असे सांगण्यातून तबलिगीजमातीची प्रतिमा उजळवण्याचा हा त्या संघटनेचा प्रयत्नही असू शकतो.जेणेकरुन देशातील उर्वरित नागरिकांच्या मनात त्यांच्याबद्दल आपुलकीची
, सहानुभूतीची भावना निर्माण होईल व त्यांनी केलेले गुन्हे विसरले जातील, माफ केले जातील. पण, भारतीय कायदेविधानात माफीचा उल्लेख कुठेही केलेला नाही. त्यामुळे कोरोना प्रसारात दोषी असणार्‍या तबलिगीं ना शिक्षाही मिळायलाच हवी. देशवासीयांच्या मुळावर उठलेल्या या तबलिगींवर कायदेशीररित्या इलाज हा व्हायला हवा. तिथे त्यांचे प्लाझ्मा दानाचे कृत्य आडवे यायला नको. सापाच्या विषावर उतारा म्हणून त्याच्या विषापासून तयार केलेली औषधेही वापरली जातात. पण, म्हणून कोणी त्या सापाला अंगाखांद्यावर घेऊन मिरवत नाही, त्याचा अधिवास जिथे असेल तिथेच सोडले जाते. म्हणूनच तबलिगीजमातीच्या कोरोनाप्रसारकांनाही कायदा ज्या कोणत्या कोठडीत जायला सांगेल, तिथेच पाठवले पाहिजे; अन्यथा अशाप्रकारे कुकृत्ये करणारे हजारो, लाखो गुन्हेगार नंतर सत्कृत्ये करुन सन्मानाची अपेक्षा करु शकतील, जे कायदा-व्यवस्थेच्या राज्यात योग्य ठरणार नाही.

आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.