दिलासादायक ! ७ दिवसात ८० जिल्ह्यात एकही नवा रुग्ण नाही

28 Apr 2020 15:19:47

dr harsh vardhan_1 &



नवी दिल्ली
: केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी मंगळवारी स्वायत्त संस्था असणाऱ्या जैवतंत्रज्ञान विभागाशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. ज्यामध्ये त्यांनी सांगितले की, गेल्या सात दिवसांपासून देशभरातील ८० जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा एकही नवीन रुग्ण आढळलेला नाही. त्याचबरोबर गेल्या २४ दिवसात १७ जिल्ह्यांत कोरोनाचा एकही नवा रुग्ण आढळला नाही.




हर्षवर्धन म्हणाले, 'मागील सात दिवसांपासून ८०जिल्ह्यांत कोणताही नवीन रुग्ण आढळला नाही तर ४७ जिल्ह्यांत मागील १४ दिवसांत एकही नवा रुग्ण दाखल झाला नाही. याचबरोबर १७ जिल्ह्यांत मागील २८ दिवसांत एकही नवीन रुग्ण दाखल झाला नाही. आरोग्यमंत्री पुढे म्हणाले की, गेल्या १४ दिवसांत आपल्याकडे रुग्ण दुपटीचे दर ८.७ होता. जो मागील आठवड्यापासून १०.२ झाला होता. हा दर मागील तीन दिवसांपासून अंदाजे १०.९ आहे. ही भारतासाठीची मोठी सकारात्मक बाजू आहे.
Powered By Sangraha 9.0