कोरोनाच्या संकट समयी अभाविप-पुणेचा गरजू विद्यार्थी व नागरिकांना मदतीचा हात

    दिनांक  28-Apr-2020 23:08:53
|


abvp pune_1  H


अभाविपने विद्यार्थ्यांना समाजामध्ये मदतीचे आवाहन करताचं अभाविपला विद्यार्थ्यांनी स्वतःच्या पॉकेट मनीतून कमीत कमी एका किटचा खर्च देऊ केलाअसे असंख्य विद्यार्थी मदत करत आहेत. समाजातून व विद्यार्थ्यांकडून मिळालेल्या मदतीला धरुन अभाविप किट गरजूंना घरपोच करत आहे.


कोरोनाच्या भयानक संकटाशी आपला देश लढत आहे. यासोबतच एक गोष्ट लिहावी वाटली म्हणून आपल्यासमोर हे लेखाद्वारे मांडतो आहे. मित्रांनो
, विद्यार्थी परिषद म्हणजे थोडक्यात सांगणं अवघडंच. विद्यार्थी न्याय मिळवून देण्यासोबतच, समाजात ज्यावेळी संकट येईल, ज्यावेळी आपत्ती येईल, समाज जेव्हा इतरांकडून मदतीची अपेक्षा करतो, त्यावेळी विद्यार्थी परिषदेचे कार्यकर्ते आपल्याला त्या समाजातील गरजू घटकांसोबत दिसतील. असेच एक आता कोल्हापूर, सांगली येथे पूरपरिस्थिती झाली होती. लोकांच्या घरांमध्ये पाणी होते. त्यावेळी विद्यार्थी परिषदेचे कार्यकर्ते तेथे जाऊन किट बनवून सोबतच संपूर्ण महाराष्ट्रात फिरून मदत गोळा करून कोल्हापूरला दिली.आजही कोरोना सारख्या संकटात विद्यार्थी परिषद
, पुणे येथे ज्यावेळी कोरोनाचा पहिला टप्पा पुण्यात सुरू झाला व रुग्णांची संख्या वाढत चालली होती, त्यावेळी विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन ज्या कार्यकर्त्यांना शक्य आहे. त्यांनी सोशल डिस्टन्सिंगलक्षात घेऊन गरजू घटकांपर्यंत मदत पोहोचवण्याची तयारी सुरू केली व साधारण एकूण २५००किट्सचे वाटप करण्याचे उद्दिष्ट घेऊन काम सुरू केले. या किटमध्ये किराणा, डाळ, तांदूळ, मीठ, मसाला, मिरची, तेल इ. वस्तूंचा समावेश आहे. सर्वात मोठी समस्या काम करताना परिषदेच्या कार्यकर्त्यांना लक्ष्यात आली ती म्हणजे जे मोठ्या प्रमाणात पुण्यात शिक्षणासाठी असणारे पूर्वोत्तरचे विद्यार्थी हे लॉकडाऊनमुळे पुण्यात अडकले आहेत. यावरून असे लक्षात येते की, कोरोनाच्या काळात समाजात असे ही प्रश्न निर्माण झाले आहेत, जसे या विद्यार्थ्यांच्या चेहर्‍याची रचना थोडीशी चीनमध्ये वास्तव्य करणार्‍या नागरिकांप्रमाणे असल्याकारणाने समाजातील काही घटकांनी त्यांना हिणवले की तुमच्यामुळे हे संकट आले, त्यांना मारले, त्यांच्यापर्यंत मदत पोहोचवून दिली नाही, हेही प्रकार या निष्पाप विद्यार्थ्यांबाबत घडले. हे विद्यार्थी परिषदेच्या लक्षात येताच क्षणाचाही विलंब न करता त्या विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी धावून गेली अभाविप. त्या विद्यार्थ्यांना साधारण १५ - २०दिवस पुरेल इतका किराणा भरून दिला. सोबत गॅसदेखील उपलब्ध करून दिल्या.
आतापर्यंत साधारण ९०० ते १हजार विद्यार्थ्यांपर्यंत अभाविप पोहोचली आहे व अजूनही गरजू विद्यार्थ्यांना मदत सुरू आहे. याबरोबर पुण्यामध्ये जवळपास ८० टक्के भाग हा
रेड झोनअसून त्याठिकाणी किराणा दुकान बंद आहेत तेथे मदतीसाठीदेखील कोणी जात नाही, तेथे अभाविपचे कार्यकर्ते जाऊन मदत करत आहेत. अभाविप पूर्णवेळ कार्यकर्ते सोबतच स्थानिक कार्यकर्ते यामध्ये सहभागी होऊन मदतीसाठी अशा ठिकाणावर जात आहेत व समाजातील गरजू घटकांपर्यंत पोहोचत आहेत. हा उपक्रम पुण्यातील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे येथून अभाविप पुणे चालवत आहे. अभाविप पुणेचे काही कार्यकर्ते स्वतःच्या घरी न जाता या कॉलेजच्या हॉस्टेलवर राहून २४ तास काम करत आहेत. समाजातील विविध लोकप्रतिनिधींकडून अभाविपच्या या उपक्रमाला भेट दिली जात आहे व अभाविपच्या या उपक्रमाचे कौतुक केले जात आहे. सोबतच महत्त्वाची बाब अशी की, अभाविपने विद्यार्थ्यांना समाजामध्ये मदतीचे आवाहन करताचं अभाविपला विद्यार्थ्यांनी स्वतःच्या पॉकेट मनीतून कमीत कमी एका किटचा खर्च देऊ केला, असे असंख्य विद्यार्थी मदत करत आहेत. समाजातून व विद्यार्थ्यांकडून मिळालेल्या मदतीला धरुन अभाविप किट गरजूंना घरपोच करत आहे.
सोबतच शैक्षणिक विषयांमध्ये अभाविप संपूर्ण महाराष्ट्रभरात ऑनलाईन लाईव्ह फेसबुक पेजद्वारे चालवत आहे. यामध्ये विविध क्षेत्रांतील तज्ज्ञांना यावर आमंत्रित करून विद्यार्थ्यांना महत्त्वाचे विषय पोहोचवत आहेत. सोबतच विविध निबंध स्पर्धा
, चित्रकला स्पर्धा, गायन स्पर्धा, ऑनलाईन घेत आहेत. सोबतच विद्यार्थ्यांच्या समस्या सोडविण्याचे काम परिषद करत आहे. अजून एक असं की परिषदेबाबत जो गैरसमज काही लोकं पसरवतात त्यांनी एकदा हे नक्की पाहावे. जगातील सर्वात मोठी विद्यार्थी संघटना अभाविप आज समाजाला मदतीचा हात देऊन नेहमी उभी असते आणि कायम राहील. अभाविप विद्यार्थ्यांच्या परीक्षांबाबत परीक्षा कशा प्रकारे व्हाव्यात, याच्या सूचनासुद्धा विद्यापीठ, युजीसी सोबतच शैक्षणिक धोरण ठरवणार्‍या यंत्रणांना देत आहे. यासोबतच लॉकडाऊननंतर विद्यार्थ्यांना राहण्याची व्यवस्था, खाणावळीची व्यवस्था कशाप्रकारे करता येईल याचादेखील अभाविप विचार करत आहे. सोबतच सर्वांना एक मदतीचे आव्हान अभाविप करत आहे, ज्यांना ज्या काही प्रमाणात मदत करणं शक्य आहे, त्यांनी मदत करावी ही विनंती.

(लेखक पुणे येथे अभाविपाचे कार्यकर्ते आहेत)

आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.