बिर्यानी चाहीए मेरेको! : तबलिघींची रुग्णालयात वॉर्डबॉयला मारहाण

27 Apr 2020 12:44:02
Tablighi _1  H
 
 
 
 

 दोन वेळचे जेवण, फळे आणि इतर गोष्टी मिळत असतानाही बिर्याणीची मागणी

 
 
 
नवी दिल्ली : कोरोना विषाणूशी लढण्यासाठी सारे जग एकवटले आहे मात्र, तबलिघी जमातचे काही रुग्ण आपल्या वर्तनात जराही सुधारणा करताना दिसत नाही. कानपूरच्या हॅलेट रुग्णालयात पुन्हा एकदा तबलिघी जमातच्य रुग्णांवर आरोप लावण्यात आला आहे. रुग्णालयातील जेवण नाकारून त्यांनी बिर्याणीची मागणी केली आहे. तसेच बिर्याणी न मिळाल्याने रुग्णालयात तोडफोड करत वॉर्डबॉयला मारहाणही केली असल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे.
 
 
 
तबलिघींचे गैरवर्तन यापूर्वीही पाहायला मिळाले होते. डॉक्टरांवर थुंकणे, आरोग्य सेविकांसमोर विवस्त्र होऊन त्यांच्याशी गैरवर्तणूक करणे, आदी प्रकारामुळे तबलिघींविरोधात नाराजीचा सुर उमटत होता. कानपूरच्या हॅलट रुग्णालयात ६० जणांवर कोरोनावर उपचार सुरू आहेत. त्यांना दोन वेळचे जेवण तसेच फळ आणि इतर आरोग्याला पूरक आहारही दिला जात आहे. मात्र, रुग्णालयाच्या महाविद्यालयातील प्राध्यापकांचा आरोप आहे की, जमाती बिर्याणीची मागणी करत आहेत. बिर्याणी न मिळ्याने रुग्णालयात तोडफोडही करत आहेत. दरम्यान, एका वॉर्डबॉयलाही मारहाण करण्यात आली आहे.
 
 
 
दरम्यान, काही तबलिघींनी कोरोनाचे उपचार पूर्ण झाल्यानंतर रक्तातील प्लाझ्मा इतर रुग्णांसाठी दान करण्याचा निर्णय घेतला आहे. काही प्रमाणात या बद्दल समाधान व्यक्त करण्यात येत आहे. ट्विटरवर #तब्लीगी_जमात_पर_गर्व_है, अशा हॅशटॅगचे ट्विट अनेकांनी करत आपली मते व्यक्त केली आहेत.
 


Powered By Sangraha 9.0