'ज्‍युबिलण्‍ट भारतीय ग्रुप'तर्फे पीएम केअर्स फंडसाठी १० कोटींची मदत

27 Apr 2020 17:56:31
PM Cares fund_1 &nbs
 
 
 
मुंबई : ज्‍युबिलण्‍ट भारतीय ग्रुपने कोविड-१९ संकटाचे निराकरण करण्‍यासाठी भारत सरकारच्‍या उपक्रमाला मदतीचा हात म्‍हणून पीएम केअर्स फंडमध्‍ये १० कोटी रूपयांचे योगदान दिले आहे. दोन ग्रुप कंपन्‍या: ज्‍युबिलण्‍ट फूडवर्क्‍स लिमिटेड (भारतातील सर्वात मोठी फूड सर्विस कंपनी आणि डोमिनोज पिझ्झा व डंन्किन डोनट्सची मास्‍टर फ्रँचायझी) आणि ज्‍युबिलण्‍ट लाइफ सायन्‍सेस लिमिटेड (एकीकृत जागतिक फार्मास्‍युटिकल्‍स व जैव विज्ञान कंपनी) यांनी फंडामध्‍ये प्रत्‍येकी ५ कोटी रूपयांचे योगदान दिले. ज्‍युबिलण्‍ट लाइफ सायन्‍सेस लिमिटेडसह तिच्‍या सर्व उपकंपन्‍यांच्‍या योगदानामध्‍ये त्‍यांच्‍या ५३०० कर्मचा-यांच्‍या एका दिवसाचा एकूण वेतनाचा समावेश आहे.
 
 
 
ज्‍युबिलण्‍ट भारतीय ग्रुप काळजी, दान, विकास या ग्रुपच्‍या वचनाचा उत्‍साह कायम राखत कोविड-१९ महामारीच्‍या प्रादुर्भावावर नियंत्रण आणण्‍यासाठी केंद्र व राज्‍य सरकारला साह्य करण्‍याशी कटिबद्ध आहे. ज्‍युबिलण्‍ट भारतीय फाऊंडेशन (जेबीएफ) या ग्रुपच्‍या ना-नफा तत्त्वावर कार्यरत संस्‍थेने तळागाळापर्यंत आरोग्‍य व सुरक्षा, अन्‍न व रेशन वाटप, सॅनिटायझेशन, संवाद, वैद्यकीय व औषध, पीपीईचे वाटप अशा क्षेत्रांमध्‍ये विविध उपाय हाती घेतले आहेत आणि विविध ठिकाणच्‍या प्रशासनांना साह्य केले आहे.
 
 
 
जेबीएफ समुदाय, हेल्‍थकेअर कामगार आणि केंद्र व राज्‍य सरकारला ज्‍युबिलण्‍ट लाइफ सायन्‍सेस लिमिटेडने उत्‍पादित केलेल्‍या सॅनिटायझरचे वाटप करत आहे. देशातील विविध ठिकाणी स्‍थलांतरित कामगार, गरोदर महिला, ज्‍येष्‍ठ नागरिक, मुले अशा वंचित समुदाय सदस्‍यांना अन्‍न व औषधांचे (रेडी टू इट फूड पॅकेट्स आणि रेशन) वाटप देखील करत आहे. जेबीएफ सेल्‍फ हेल्‍प ग्रुप्‍सच्‍या (एसएचजी) माध्‍यमातून देशातील विविध साइट्समध्‍ये पुनर्वापर होण्‍याजोग्‍या कॉटन मास्‍क्सची शिलाई करत आहे.
 
 
 
 
हे मास्‍क्स वॉशेबल आणि पुनर्वापर करता येण्‍याजोगे आहेत. फाऊंडेशन त्‍यासाठी कच्‍चा मालाचा पुरवठा करत आहे. त्‍याचप्रमाणे, ज्‍युबिलण्‍ट फूडवर्क्‍स लिमिटेड प्रभावित नागरिक व पोलिस कर्मचा-यांना पीपीई किट्स व अन्‍नाचे वाटप करत आहे. कंपनीने नागरिकांना त्‍यांच्‍या घरामध्‍येच सुरक्षित राहण्‍यामध्‍ये साह्य करत रोजच्‍या आवश्‍यक वस्‍तूंचा पुरवठा करण्‍यासाठी पीठ, दूध अशा आवश्‍यक वस्‍तूंच्‍या वितरणाकरिता त्‍यांच्‍या डोमिनोज डिलिव्‍हरी टीम व पुरवठा साखळी नेटवर्कची देखील मदत घेतली आहे.
 
 
 
 
Powered By Sangraha 9.0