नव्या वाटेवरील, नव्या संधी!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    27-Apr-2020
Total Views |


business_1  H x


बांधकाम क्षेत्र हे असंघटित कामगारांवर अवलंबून आहे. या कामगारांपैकी बहुतांशी कामगार हे परराज्यातून येतात. या पुढे बांधकाम क्षेत्रातील व्यावसायिकांना त्यांच्याकडे असलेल्या कामगारांची अधिक काळजी घ्यावी लागेल, त्यांच्यासाठीदेखील वेळोवेळी आरोग्य तपासणी करणं बंधनकारक होऊ शकेल.



असं म्हणतात की ‘गरज ही शोधाची जननी आहे.’ आज अनेक उद्योगांवर संकट असल्याने प्रत्येकाला या संकटाशी सामना करावा लागेल. या लढाईत कोणी जिंकेल, तर कोणी मागे पडेल. या लढाईत जिंकण्यासाठी नावीन्यपूर्ण विचार पद्धती, अचूक पण झटपट निर्णय क्षमता आणि दूरदृष्टीसह उत्तम नेतृत्व या गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. कोरोनानंतर जग कसं असणार आहे, याचा अभ्यास करून भविष्यातील गरज ओळखणारे या संकटावर नक्कीच मात करू शकणार आहे. हे आर्थिक वर्ष जरी वाईट जाणार असलं तरी पुढील आर्थिक वर्ष अत्यंत समृद्ध असणार आहे. आंतरराष्ट्रीय नाणे निधी’च्या अहवालानुसार, पुढील वर्षी भारताचा जीडीपी ७ टक्क्यांच्या घरात असणार आहे. त्यामुळे ज्यांना पुढील वर्षाचा फायदा घ्यायचा असेल, त्यांना या वर्षी व्यवसायात टिकून राहावचं लागणार आहे. टिकून राहण्यासाठी आडवाटेच्या संधी हेराव्या लागतील.



पुढील किमान दोन वर्षे पर्यटन व्यवसायास उभारी घेणे अवघड दिसतं. परंतु, लोकांना पर्यटन हवं असल्याने घरात राहूनच तुम्ही त्यांना काय आनंद देऊ शकाल? ‘व्हर्च्युअल रिऍलिटी’चा वापर करून तुम्ही एखाद्या देशाचं पर्यटन घडवून आणलं तर? म्हणजे समजा, सिंगापूरच्या सगळ्या पर्यटनस्थळांचा एक ‘व्हर्च्युअल’ टूर, सोबत सिंगापूरची घरपोच पाककृती, तिथल्या काही कलाकृती, परिवाराचा ग्रुप फोटो, सगळ्यांसाठी एखादी हातातली पिशवी, टीशर्ट म्हणजे त्या कुटुंबाने खरोखरच सिंगापूरची वारी केली आहे, हा अनुभव नक्कीच लोकांना आवडेल. एखाद्या देशाचं किंवा राज्याचं पर्यटन वाढवण्यासाठी ही खूप छान क्लृप्ती ठरू शकेल.



व्यवसायानिमित्त बाहेरगावी जाणारे प्रवासी सार्वजनिक वाहतूक प्रवास, ओला-उबरचा वापरदेखील टाळतील. अशावेळी प्रवासासाठी स्वतः चालवण्याचा पर्याय असलेल्या ‘झूम’ कार सारख्या कंपन्यांची मागणी वाढेल. तुम्ही तुमच्याकडील असलेलं वाहन अशा कंपन्यांना देऊन त्यातून पर्यायी उत्पन्न घेऊ शकता. अशा सार्‍या खाजगी वाहनांना वेळोवेळी निर्जंतुकीकरण्याची सेवा देण्याच्या व्यवसायालादेखील चांगली मागणी वाढेल. कार्यालयात इन्फ्रा रेड थर्मामीटर पुरवणे, कार्यालयीन वाहनाचेदेखील निर्जंतुकीकरण करणे, इतर आरोग्य सेवा पुरवणे यांची मागणीदेखील नक्कीच वाढेल.



बांधकाम क्षेत्र हे असंघटित कामगारांवर अवलंबून आहे. या कामगारांपैकी बहुतांशी कामगार हे परराज्यातून येतात. या पुढे बांधकाम क्षेत्रातील व्यावसायिकांना त्यांच्याकडे असलेल्या कामगारांची अधिक काळजी घ्यावी लागेल, त्यांच्यासाठीदेखील वेळोवेळी आरोग्य तपासणी करणं बंधनकारक होऊ शकेल. मोठ्या कंपन्यांमध्ये ज्याप्रमाणे कॅन्टीनची सुविधा असते, त्याचप्रमाणे बांधकाम क्षेत्रातील कामगारांनादेखील कॅन्टीन सुविधा संधी निर्माण होईल. यामुळे अनेक महिला, बचत गट या संधीचा फायदा घेऊ शकतील. अशा अनेक नव्या संधी निर्माण होतील. या संधीचं सोन करायला तयार व्हा!


- प्रसाद कुलकर्णी

@@AUTHORINFO_V1@@