'झुलवा' कादंबरीकार उत्तम बंडू तुपे कालवश

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    26-Apr-2020
Total Views |
File Pic_1  H x
 
 
 


आठवण १९९८: जळगाव येथील पहिल्या समरसता साहित्य संमेलनाचे निमंत्रक "झुलवा"कार उत्तम बंडू तुपे हे नाशिक येथे ज्येष्ठ साहित्यिक तात्यासाहेब शिरवाडकर यांना निमंत्रण देतांना- सोबत समरसता मंच,नाशिकचे निमंत्रक गजानन होडे,रा स्व संघाचे प्रांत प्रचार प्रमुख दिलीप क्षीरसागर व समरसता मंच संघटक विजयराव कापरे 


नाशिक : ज्येष्ठ साहित्यिक "झुलवा" कादंबरी चे साहित्यिक उत्तम बंडू तुपे यांचे वयाच्या ८९ वर्षी अल्पशा आजाराने रविवारी सकाळी आठ वाजता निधन झाले. दि २२ एप्रिल रोजी जहांगीर रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आले होते. गेले काही दिवस त्यांच्यावर उपचार सुरू होते.
 
 
 
एका छोट्याश्या खेड्यातील जन्मगाव असलेले तुपे दुष्काळी परिस्थितीत सापडून पुणेकर झाले. बहिणीने या काळात त्यांची मदत केली. पुढे त्यांना वामनराव देशपांडे भेटले. तेथे त्यांनी अण्णा भाऊ साठे यांचे साहित्य मनःपूर्वक वाचले. तो प्रभाव त्यांच्यावर पडला आणि त्यांच्यतील लेखन बीज अंकुरले.
 
 
 
पुणयात त्यांनी काही दिवस आत्याचा आश्रय घेतला. पडेल ती कामे पत्करली. हातावरची मोल मजुरी करून दिवस काढले. तिथल्या झोपडपट्टीत हा प्रतिभावंत लेखक वाढला. त्याला योगायोगाने जिवाभावाची मानलेली मीनाताई बहीण भेटली. अनेकानेक कटू अनुभवांना सामोरे जावे लागले. अल्पशिक्षित असूनही उत्तम बंडू तुपे यांनी मराठीमध्ये विपुल लेखन केले आहे. कादंबरी, लघुकथा, नाटक आणि आत्मकथन या प्रकारांत त्यांनी मोलाची कामगिरी बजावली आहे.



@@AUTHORINFO_V1@@