दिल्ली हिंसाचार : बंदुका, पेट्रोल बॉम्ब घेऊन तयारीने रचला कट

    दिनांक  26-Apr-2020 15:04:44
|
Umar Khalid_1  
 
 


नवी दिल्ली : जेएनयूचा विद्यार्थी उमर खालीदविरोधात दिल्लीत हिंसाचार उसळवल्या प्रकरणी एफआयआर दाखल करण्यात आली आहे. खालीद आणि त्याचा सहकारी दानिश विरोधात दिल्ली क्राईम ब्रांचने गुन्हा दाखल केला आहे. अधिकारी अरविंद कुमार यांनी हा गुन्हा दाखल केला आहे. पोलीसांतर्फे मिळालेल्या एफआयआरमध्ये ही माहिती देण्यात आली आहे. हिंसाचार उफळवण्याचे षडयंत्र रचल्याचा त्याच्यावर आरोप आहे.
 
 
 
एफआयआरमध्ये नमूद केल्या प्रमाणे दंगल भडकवण्याचा सुनियोजित कट उमर खालीद आणि त्याच्या दोन सहकाऱ्यानी रचला. हे दोघेही वेगवेगळ्या संघटनांशी संलग्न आहेत. यांनीच मिळून लोकांना भडकवण्याचा प्रयत्न केला होता. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या दौऱ्यावेळी काही हिंसक प्रवृत्तींनी रस्त्यावर येऊन धुमाकूळ घातला होता. २४ ते २४ फेब्रुवारी दरम्यान ट्रम्प भारत दौऱ्यावर होते.
 
 
 
उमर खालीदविरोधातील एफआयआर काय सांगते ?
 
 
 
एफआयरमध्ये नमूद केल्यानुसार, भारतात अल्पसंख्यांकांवर अत्याचार होत असल्याचा संदेश आंतरराष्ट्रीय पातळीवर जावा यासाठी हा हिंसाचाराचा कट रचण्यात आला. ट्रम्प दौऱ्यादरम्यान काही विदेशी पत्रकारही उपस्थित होते. त्यांचे लक्ष या प्रकाराकडे वेधून घेण्याचा प्रयत्न तसेच हिंसाचार भडकवला जावा यासाठी हा कट रचल्याचे म्हटले गेले आहे.
 
 
 
कटात दिल्लीतील मौजपूर, कर्दमपुरी, जाफराबाद, चांदबाग, गोकुळपूरी आणि शिव विहार इथल्या घराघरांमध्ये बंदूका, पेट्रोल बॉम्ब आणि अॅसिडच्या बाटल्या ठेवण्यात आल्या होता. तसेच अन्य काही घातक रसायनांचाही साठा करण्यात आला होता. दंगलीत गर्दी जमा करण्यासाठी उमर खालीद आणि दानिश यांनी विविध भागांतून जमावाला एकत्र केले होते.
 
 
 
जाफराबाद मेट्रो स्थानकही याच कटाअंतर्गत चक्काचाम करण्यात आले होते. इथे आंदोलन करणाऱ्या महिला आणि स्थानिकांना भडकवण्यात आले. २३ फेब्रुवारी रोजी हाहाकार माजवण्यात आला होता. या भागातील मुलांना आधीच दुसरीकडे हलवण्यात आले होते, असेही एफआयआरमध्ये नमूद करण्यात आले आहे. जेणेकरून त्यांना कुठलीही इजा होणार नाही. पोलीस या प्रकरणाची सखोल चौकशी करत असून त्यात विविध पैलू उलगडत आहेत.
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.