सगळ्यांसाठी लॉकडाऊन मात्र सलमानच्या वडिलांना 'मॉर्निंग वॉक'साठी पास!

    दिनांक  25-Apr-2020 10:10:15
|

salim khan_1  H


सलीम खान यांनी दिले स्पष्टीकरण


मुंबई : कोरोनामुळे देशात ३ मे पर्यंत लॉकडाऊन गोषित करण्यात आला आहे. या दरम्यानच्या काळात सामान्य नागरिकांना कारणाशिवाय घराबाहेर पडण्याची परवानगी नाही. असे असताना बॉलिवूड अभिनेता सलमान खानचे वडील सलीम खान यांना लॉकडाऊनच्या काळात मॉर्निंग वॉकला जाण्याची परवानगी कशी मिळाली असा सवाल विचारला जात होता. त्याचा खुलासा खुद्द सलीम खान यांनीच केला आहे.


“मी गेल्या ४० वर्षांपासून मॉर्निंग वॉकला जातोय. तसेच कित्येक वर्षांपासून आमच्या परिसरातल्या पक्ष्यांना दाणे टाकतो. लॉकडाऊनच्या काळात त्यांची काळजी घेणंही तितकंच गरजेचं आहे.”, असे सलीम खान यांनी म्हंटले आहे. शिवाय पाठीचा त्रास असल्याने चालणे आवश्यक आहे आणि सगळ्या नियमांचे काटेकोरपणे पालन करत मी वॉकला जात असल्याचे त्यांनी सांगितले. मॉर्निंग वॉकसाठी ३० एप्रिलपर्यंतचा त्यांना पास देण्यात आला आहे. जातो. 


सलमानचे वडील सलीम खान दररोज आपल्या मित्रांसोबत मॉर्निंग वॉकला जातात. सकाळी साडेआठ ते नऊ वाजेपर्यंत ते घराबाहेर फिरत असतात. जर नियम सर्वांसाठी सारखेच आहेत. तर पोलीस प्रशासन सलमानच्या वडिलांवर कारवाई का करत नाही? की केवळ ते सेलिब्रिटी आहेत म्हणून त्यांना लॉकडाउनचे नियम लागू होत नाहीत? असा प्रश्न वांद्रे इथल्या स्थानिकांनी सरकारला विचारला होता.
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.