नाशिकमध्ये रेल्वेच्या धडकेत बिबट्याचा मृत्यू

24 Apr 2020 21:18:12
leopard _1  H x
(file photo) 
 
 
 

धडकेने बिबट्याचे शीर शरीरापासून वेगळे झाले

मुंबई (प्रतिनिधी) - नाशिक रोड रेल्वे स्थानकापासून काही अंतरावर आज पहाटे बिबट्याचा मृतदेह आढळून आला. रेल्वेच्या धडकेत या मादी बिबट्याचा मृत्यू समोर आले आहे. वन विभागाने घटनास्थळाची पाहणी करुन मृतदेहावर अंत्यसंस्कार केले.
 
 
 
 
रेल्वे धडकेत आज पुन्हा एकदा बिबट्याच्या मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. नाशिक रेल्वे स्थानकापासून काही अंतरावर असलेल्या लहवित रेल्वे स्थानकाजवळ बिबट्याचा मृतदेह सापडला. हा मृतदेह मादी बिबट्याचा असल्याचे उघड झाले आहे. आज पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास रेल्वे रूळ ओलांडणाऱ्या पाच वर्षाच्या मादी बिबट्याला धावत्या मालगाडीने धडक दिली.ही धडक इतकी जोरदार होती की, मादीचे शीर शरीरापासून वेगळे झाले. त्यामुळे मादीचा जागीच मृत्यू झाला. स्थानिक नागरिकांनी वन विभागाला पाचारण करून घटनेची माहिती दिली. या मृत बिबट्यावर वनकर्मचाऱ्यांनी अंत्यसंस्कार केले. काही दिवसांपूर्वीच्या रविवारी पहाटे एका लहान मुलावर बिबट्याने हल्ला केला होता. त्यामध्ये हा मुलगा ठार झाला. त्यामुळे रेल्वे धडकेत मृत पावलेला बिबट्या तोच आहे का, याबाबत आता शोध घेण्यात येत आहे. दरम्यान आज निफाड जवळ एका बिबट्याला जेरबंद करण्यात आले आहे. 
Powered By Sangraha 9.0