रंगोलीला पाठिंबा देणाऱ्या कंगनाविरोधात पोलिसात तक्रार

    दिनांक  24-Apr-2020 13:56:35
|

kangana_1  H x


तबलिगी आणि साधू हत्येविरोधात ट्विट करणाऱ्या रंगोलीचे ट्विटर बंद; बहिणीला पाठींबा दर्शविणाऱ्या कंगनाविरोधात तक्रार


मुंबई : बहिण रंगोली चंडेलला पाठींबा दिल्यामुळे बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणावत विरोधात पोलिस तक्रार दाखल करण्यात आली आहे. रंगोली चंडेल हिच्या ट्विटर अकाऊंटवर काही दिवसांपूर्वी कारवाई करत ते बंद करण्यात आले होते. रंगोलीने तबलिगी आणि पालघरमध्ये घडलेल्या साधू हत्याकांडाचे निषेध करणारे ट्विट केले होते. रंगोलीचे ट्विट हे द्वेष पसरवणारे होते असा आरोप अनेकांनी तिच्यावर केला.


मुंबईस्थित वकील अली खाशिफ खान देशमुख यांनी रंगोलीला समर्थन देणाऱ्या कंगनाविरोधात तक्रार दाखल केली आहे. 'एक बहिणी द्वेष पसरवते तर दुसरी तिच्या समर्थनार्थ पुढे येते, अशी टीका वकील अली यांनी केली आहे. 'स्वत:च्या फायद्यासाठी ती स्टारडम, पैसा, प्रसिद्धी, ताकद आणि प्रभावाचा वापर करत आहे', असाही आरोप अली यांनी केला आहे.


कंगनाने इन्स्टाग्रामवर व्हिडिओ शेअर केला आहे ज्यावरुन ती वादात सापडली आहे. माझ्या बहिणीने जर वादग्रस्त ट्विट केले असतील आणि कोणीही त्या ट्विटचा पुरावा दिला तर आम्ही दोघीही सर्वांची माफी मागू असे म्हणत कंगनाने बहीण रंगोलीची बाजू घेतली आहे.
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.