कोरोनाशी लढा : 'अॅप्रन' चढवून गोव्याचे डॉक्टर मुख्यमंत्री मैदानात

24 Apr 2020 19:16:19

pramod sawant_1 &nbs
 

गोवेकरांना भेटला डॉक्टर रुपातला 'सीएम'

पणजी : आज संपूर्ण देश कोरोनाशी लढा देत आहेत. अशातच गोवा हे देशातील कोरोनामुक्त होणारे पहिले राज्य ठरले. दरम्यान, या राज्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आज, दि. २४ एप्रिल रोजी आपला वाढदिवस कर्तव्यदक्षता दाखवत साजरा केला. कोरोना या लढाईच्या प्रसंगी त्यांनी जिल्हा रुग्णालयात आरोग्यसेवा देत आपले कर्तव्य बजावले.
 
देशावर कोरोनाचे वादळ घोंगावत असताना वाढदिवस साजरा करणार नाही हे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी यापूर्वीच जाहीर केले होते. मात्र,कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी म्हापसा येथील जिल्हा रुग्णालयाची त्यांनी पाहणी केली. रुग्णालयामध्ये फेरफटका मारत त्यांनी रुग्णांची विचारपूस केली. त्यांनी स्वतः काही रुग्णांची तपासणी केली आणि पुन्हा एकदा डॉक्टर होत कर्तव्यदक्षपणा दाखवला.
 
यावेळी ते म्हणतात, “सध्या कोरोनाविरूढ देशातील सर्वच डॉक्टर आणि आरोग्य कर्मचारी लढा देत आहेत. आज वाढदिवसानिमित्त यांना पाठींबा देण्यासाठीच मी वैद्यकीय सेवा बजाविण्याचा निर्णय घेतला आहे. या लढ्यामध्ये कोरोना हरणार आणि देश नक्की जिंकणार असा माझा विश्वास आहे.” अशी भावना त्यांनी व्यक्त केले. तसेच, सध्या देशातील काही भागात डॉक्टरांवर होत असलेल्या जीवघेण्या हल्ल्यांबद्दल त्यांनी खेद व्यक्त केला. केंद्र सरकारने या परिस्थितीची दखल घेत उचललेल्या कडक पावलांमुळे या घटनांना नक्कीच आळा बसेल, असा आशा त्यांनी बाळगली.
 
 
 
 
Powered By Sangraha 9.0