ईटलीमध्ये ‘बेला सियाओ...’

    दिनांक  24-Apr-2020 22:31:11   
|

बेला सियाओ _1  एका सकाळी मी उठले
चिखलाने भरलेल्या शेतात जाण्यासाठी
किडे आणि मच्छर यांच्यामध्ये जाण्यासाठी
हे रम्य सौंदर्या गुड बाय गुड बाय...
(बेला सियाओ बेला सियाओे)े
शेतात गेल्यावर
तेथील मालक छडी घेऊन उभा आहे
मारण्यासाठी आई गं,
किती हा छळवाद आहे
प्रत्येक क्षण तारूण्य संपवत आहे,
आशा संपवत आहे.
हे रम्य सौंदर्या, गुड बाय गुड बाय...
(बेला सियाओ बेला सियाओे)
हे इटलीचे एक लोकगीत. १९०६च्या दरम्यान इटलीच्या शेतातल्या आयाबाया हे गीत गात. कष्टाचे जिणे, गरिबी त्यातही शोषण आलेच. त्यामुळे मन रमवण्यासाठी आणि आपले दु:ख हलके करण्यासाठी शेतकरी महिला हे गीत गात. सगळ्यांची दु:खे समानच. जगण्यासाठी दाही दिशा. त्या आयुष्यात ना संवेदना ना मानवी शाश्वत मूल्यांचे सौंदर्य. पुढे हेच गीत मात्र नंतर ते इटलीमध्ये दुसर्‍या स्वरूपात गायले जाऊ लागले.दि. २२ ऑक्टोबर ते २९ ऑक्टोबर, १९२२साली हजारो लोक काळे शर्ट परिधान करून इटलीच्या रोमकडे कूच करू लागले. त्यांचे नेतृत्व केले बेनिटो मुसोलिनी यांनी ते कधीकाळी हिटलरचे निकटवर्ती होते. अर्थात, हिटलरच्या विचारांचा पगडा त्यांच्यावर असणारच, तर या हजारो लोकांनी मार्च काढला आणि रोमवर बेनिटो मुसोलिनीने सत्ता काबिज केली. मुसोलिनीचा (बेला सियाओ बेला सियाओे) फासीवाद सर्वश्रुत आहे. त्याने सत्ता काबिज केली ती मुख्यत: साम्यवादाविरोधात असे म्हटले जाते. पण, काहींच्या मते त्याची विचारधारा ही अतिशय कडवट आणि सर्वार्थांने तो ती इटलीच्या जनतेवर लादत होता. या विचारधारेने इटलीच्या जनतेचे स्वातंत्र्य हिरावल्यासारखेच होते. मुसोलिनीच्या फासीवादाविरोधातही मग देशात सूर उमटू लागले. माणसाला स्वातंत्र्याची आवड निसर्गत:च असते. त्यामुळे अगदी हिरेमोत्याच्या पिंजर्‍यात जरी त्याला कैद केले, सोन्याचा घास जरी भरवला तरी त्याला पिंजर्‍याबाहेरचे जग त्या हिरेमोती आणि सोन्यापेक्षाही अमूल्यच वाटते. या स्वातंत्र्याचा ध्यास घेऊनच जगभरात क्रांतीचे पर्व उमटले.
प्रत्यक्षात मुसोलिनीनेही साम्यवाद, समाजवादाच्या शृंखलेतून मुक्त होण्यासाठीच रोमचा तो प्रसिद्ध मार्च काढला होता. कृतींना बांधून ठेऊ शकतो, पण विचारांना नाही. त्यातही मनाच्या शक्तीतून उमटलेल्या वैचारिक क्रांतीला तर कुणीही थोपवू शकत नाही. हे सत्य मुसोलिनी विसरला. त्यामुळेच इटलीला आपले अंकित करण्यासाठी मुसोलिनीने कडक निर्बंध लादले. त्यातूनच मुसोलिनीच्या कडव्या विचारधारेला विरोध करण्यासाठीही हे गीत एक आधार बनले. मात्र, दुसर्‍या महायुद्धात जर्मनचे सैन्य इटलीवर चाल करून आले. त्यावेळी त्या परकीय आक्रमकांना विरोध करण्यासाठी इटलीमधली जनता सिद्ध झाली. त्यांना कोणाचे समर्थन होते ना कुणाचे पाठबळ. परक्यांपासून आपल्या स्वातंत्र्याचे रक्षण हा एकच विचार त्यांची प्रेरणा होती. या विचारांची प्रेरणा, ही क्रांती घरात, शेतात, कारखान्यात, बंगल्यात आणि अगदी झोपड्यातही आपली चेतना जागृत करू लागली. एकमेकांना प्रेरणा देण्यासाठी हे क्रांतीकारी पुन्हा ‘बेला सियालो’ गीत गाऊ लागले. मात्र, आता ‘बेला सियाओेे’ गीताचे बोल बदलले होते. ते असे होेते -
एका सकाळी मी उठलो
हे रम्य सौंदर्या गुड बाय गुड बाय...
(बेला सियाओ, बेला सियाओे)
ते आक्रमणकर्ते मला खेचून नेत आहेत
मी मरणार आहे
हे रम्य सौंदर्या गुड बाय गुड बाय...
(बेला सियाओ, बेला सियाओे)
मरणार आहे, स्वातंत्र्यासाठी..
हे रम्य सौंदर्या, गुड बाय गुड बाय
(बेला सियाओ, बेला सियाओे)
हे गीत गात इटलीने जर्मनी सैन्यापासून, फासीवादापासून, मुसोलिनीपासून मुक्तीच मिळवली. इटली देश पुन्हा स्वतंत्र झाला. दिवस होता २५ एप्रिल १९४५.


आज इटलीचा स्वातंत्र्य दिन. फासीवादाविरूद्ध शोषणाविरूद्ध ‘बेला सियाओ’ गीत गाणारे इटलीवासी आजही आजही ‘बेला सियाओ’ गात आहेत. पण, आता ते या गीताने कडवा विरोध करत आहेत ते कोरोनाला. कोरोनासारख्या शत्रूला हाकलवून लावण्यासाठी इटलीचे लोक आपआपल्या स्थानावरून ‘बेला सियाओ’ आजही गातात. कोरोनाने इटलीमध्ये हाहाकार उडवला आहे. या शत्रूविरोधात इटलीत पुन्हा ‘बेला सियाओ, बेला सियाओ’ गान घुमू लागले आहे.
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.