कोरोनाशी लढणाऱ्या संघ स्वयंसेवकांच्या देशभरातील कार्याचा आलेख एका क्लिकवर

24 Apr 2020 14:50:55

maps_1  H x W:


मुंबई : कोरोना महामारीच्या संकटात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे असंख्य स्वयंसेवक आज देशभरात मदतकार्य करत आहेत. आता यासर्व कार्याचा सविस्तर आढावा एका क्लिकवर आपणास पाहायला मिळणार आहे.


जेव्हा जेव्हा देश आणि समाजावर संकट आले तेव्हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांनी स्वत:च्या जीवाची चिंता न करता सामाजिक कार्यासाठी पुढाकार घेतला. 'सेवा परमो धर्म:' या ब्रिदवाक्याचे स्वयंसेवकांनी तंतोतंत पालन केले आहे. याची असंख्य उदाहरणे आपल्यासमोर आहेत. आताही जेव्हा कोरोना विषाणूच्या संकटाची झळ भारतापर्यंत पोहोचली तेव्हा संघाच्या स्वयंसेवकांनी तातडीने स्वतःला मदतकार्यात झोकून दिले. समाजातील दुर्लक्षित व गरजवंत घटकांना मदत करण्यास सुरवात केली. या कार्यांची राज्यनिहाय संख्या, छायाचित्रे असे सगळे एकाच वेबपेज वर नकाशा सह दाखवले आहे. याचबरोबर दुसरा ही तेवढाच महत्वपूर्ण नकाशा यात दाखवला आहे तो देशातील कोरोनाग्रस्त रुग्णांच्या संख्येची आकडेवारी दर्शवितो. येथे आपल्याला जिल्हानिहाय आकडेवारी बघता येईल. हे दोन्ही नकाशे वेळोवेळी अपडेट होणार आहेत.




रा . स्व. संघ राज्यनिहाय मदतकार्य , सौजन्य : न्यूज भारती 

कोणत्या राज्यात किती मदतकार्य करण्यात येत आहे हे पाहण्यासाठी संबंधित नकाशाची मदत घ्या. ज्या विषयाची किंवा राज्याची आपल्याला माहिती मिळवायची आहे त्या राज्यावर कर्सर नेताच, आपणास रा. स्व. संघ आणि स्वयंसेवकांमार्फत चालू असलेल्या सेवा उपक्रमांची माहिती प्राप्त होईल. तसेच, दिलेल्या लिंकवर क्लिक केल्यानंतर आपण सेवा कार्याची काही छायाचित्रे आणि व्हिडिओ पाहू शकता. रा. स्व. संघाच्या रचनेनुसार प्रत्येक प्रांतात किती सेवा उपक्रम चालू आहेत, किती कामगार सेवा देत आहेत, किती कुटुंबांची मदत केली आजच्या आहे, किती कुटुंबांना तयार फूड पॅकेट व रेशन किटचे वाटप केले आहे, किती ठिकाणी रक्तदान केले आहे शिबिरे घेण्यात आली आहेत आणि स्थानिक लोकांसाठी कोणते सहाय्यकारी उपक्रम सुरू आहेत याची माहिती या नकाशावर उपलब्ध आहे.




देशातील कोरोना रुग्णाची आकडेवारी, सौजन्य : न्यूज भारती 
Powered By Sangraha 9.0