ब्रेकींग न्यूजच्या काळातही वाचकांचा वृत्तपत्रांवरच विश्वास

23 Apr 2020 18:10:29
Actor Subodh Bhave readin
 
 
 

नवी दिल्ली : मोठी ब्रेकींग, सर्वात वेगवान, सर्वांच्या पुढे, असे म्हणत वृत्तांकन करणाऱ्या वृत्तवाहिन्या असोत किंवा अन्य कुठलीही माध्यमे वृत्तपत्रांचा दबदबा हा स्वातंत्रपूर्व काळापासून कायम आहे. लॉकडाऊनमध्येही वाचकांचा वृत्तपत्रांवरच विश्वास कायम असल्याचे एका सर्वेक्षणातून उघड झाले आहे.
 
देशभरात लॉकडाऊनच्या काळात वाचकांच्या सवयीत बदल झाल्याचे पाहायला मिळाले आहे. एका सर्वेक्षणात उघड झालेल्या माहितीद्वारे उघड झाले आहे. वृत्तपत्रांतील आकडेवारीच्या विश्वासार्हतेमुळे या काळातील विश्वासार्ह आणि अचूक बातम्यांसाठी वाचक याच माध्यमावर विसंबला असल्याचे स्पष्ट झाले आहे. 
 
'एव्हांस फिल्ड अॅण्ड ब्राण्ड सॉल्यूशन एलपीपी' या संस्थेने लॉकडाऊन दरम्यान वाचकांचे एक सर्वेक्षण केले आहे. या अंतर्गत देशातील एकूण ३८ टक्के वाचक रोज एक तासाहून अधिक वेळ वृत्तपत्र वाचण्यात घालवत आहेत. लॉकडाऊनपूर्वी ही टक्केवारी केवळ १६ टक्के इतकीच होती. 
 
१३ एप्रिल ते १६ एप्रिल दरम्यान, देशभरातील विविध राज्यांतील वाचकांच्या सर्वेक्षणातून ही माहिती उघड झाली आहे. यात केवळ वाचकांनी वृत्तपत्र वाचण्यात किती वेळ घालवला यापेक्षाही अनेक पैलू खुले झाले आहेत. लॉकडाऊनपूर्वी ४२ टक्के वाचक ३० मिनिटांहून जास्त वेळ वृत्तपत्र वाचत होते. मात्र, यात वाढ होऊन हे प्रमाण ७२ टक्क्यांवर गेले आहे. 
 
 
५८ टक्के वाचक संपूर्ण वृत्तपत्र वाचतात
तीन टक्के असेही वाचक आहेत की, जे केवळ १५ मिनिटे वृत्तपत्र वाचतात. लॉकडाऊनपूर्वी ही वाचक संख्या १४ टक्क्यांवर होती. लॉकडाऊनपूर्वी सरासरी वाचक वृत्तपत्र वाचण्यासाठी ३८ मिनिटे वेळ देत होते, ते आता ६० मिनिटांहून जास्त वेळ वृत्तपत्र वाचन करतात. ५८ टक्के वाचक हे एका वेळेला संपूर्ण वृत्तपत्र वाचून पूर्ण करतात. यातील ४२ टक्के असेही वाचक आहेत, की दिवसभर विविध वेळेला विविध वृत्तपत्रांचे वाचन करत असतात. एकूणच शांत चित्ताने जगभरातील घडामोडींवर नजर फिरवण्यासाठी वृत्तपत्रांवर विश्वास ठेवला जात आहे.
Powered By Sangraha 9.0