विश्व हिंदू परिषदेकडून साधूंच्या हत्येचा निषेध ; राज्यपालांची घेतली भेट

    23-Apr-2020
Total Views | 70

विश्व हिंदू परिषद _1 



मुंबई
: पालघर हिंदू साधूंच्या हत्येप्रकरणी विश्व हिंदू परिषदेच्या संतानी आज महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतली आणि दोषींना कठोर शिक्षा करण्याची मागणी केली. मुंबईतील राजभवनात येथे झालेल्या या बैठकीत विश्व हिंदू परिषदेच्या केंद्रीय मार्गदर्शक मंडळाचे हे तीन महंत सदस्य महामंडलेश्वर स्वामी विश्वेश्वरानंद महाराज, स्वामी शंकरानंद महाराज आणि स्वामी सुखदेवानंद महाराज यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान पालघर साधूंच्या हत्येच्या विरोधातील भूमिकेबाबत देखील राज्यपालांना माहिती दिली.



१६ एप्रिल रोजी एक चालक आणि दोन साधूंना शंभर एक लोकांनी अमानुष मारहाण करत जीवे मारल्याची घटना काही दिवसांपूर्वी पालघरमध्ये घडली होती. पोलीसांनी कारवाई करत याविरोधात गुन्हा दाखल केला मात्र, आता ज्याप्रकारे या साधूंना अमानुष मारहाण करण्यात आली होती. त्याचा व्हीडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यानंतर अनेकांनी तीव्र प्रतिक्रीया व्यक्त केल्या. याच घटनेचा निषेध करत विश्व हिंदू परिषदेच्या महंतांनी राज्यपालांची भेट घेतली. 
अग्रलेख
जरुर वाचा
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर शिवरायांचा भव्य पुतळा!

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर शिवरायांचा भव्य पुतळा!

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मानले आभार छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेल्या १२ किल्ल्यांना युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत स्थान मिळाल्याच्या पार्श्वभूमीवर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी विधानसभेत महत्त्वपूर्ण घोषणा केली. मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे शिवरायांचा भव्य अश्वारूढ पुतळा उभारण्यात येणार असून, यासाठी केंद्र सरकारने आधीच नियोजन केले आहे. यासोबतच, नाना जगन्नाथ शंकर शेठ यांचे नाव मुंबई सेंट्रल स्थानकाला देण्याचा प्रस्तावही केंद्राकडे प्रलंबित ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121